राजकारण

राज्यात पुन्हा गांधी विरूध्द आंबेडकर राजकीय वाद

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना आगामी निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये असे जाहिर वक्तव्य केले. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तुषार गांधी यांच्यावर पलटवार केला. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा गांधी विरूध्द आंबेडकर असा वाद पाह्यला मिळाला. तुषार गांधी यांनी केलेल्या …

Read More »

परराराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना इशारा, इराण-इस्त्रायलचा प्रवास टाळा

परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एक अधिसूचना जारी करून भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्यास सांगितले आहे. पुढील ४८ तासांत इराण इस्रायलवर थेट हल्ला करणार असल्याच्या वृत्तांदरम्यान ही बाब समोर आली आहे. मंत्रालयाने सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून स्वतःची नोंदणी करण्याचे आवाहन करत …

Read More »

एनआयएकडून रामेश्वरन कॅफे स्फोटप्रकरणातील आरोपींना अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटामागील मुख्य आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. कोलकाता येथील लपून बसलेल्या आरोपींना पकडण्यात आले. दहशतवादविरोधी एजन्सीने सांगितले की, मुसावीर हुसैन शाजीबने कॅफेमध्ये बॉम्ब ठेवला होता आणि अब्दुल मतीन ताहा हा स्फोटाचा मास्टरमाईंड होता. मुसावीर हुसैन शाजीब, अब्दुल मतीन ताहा हे …

Read More »

महाराष्ट्रासाठी २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्यांची तरतूद

लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या लागणार आहेत. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांमध्ये ९८ हजार ११४ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार संघासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे १ लाख ९६ हजार २२८ …

Read More »

महेश तपासे यांचे प्रत्युत्तर, नकली राष्ट्रवादी व नकली शिवसेना ही भाजपासोबत

आमच्या राष्ट्रवादीला नकली राष्ट्रवादी संबोधणारे अमित शाह कोण अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. महेश तपासे पुढे बोलताना म्हणाले की, आमच्यातल्या काही नकली नेत्यांना भारतीय जनता पार्टीने या आधीच स्वतःच्या सरकारमध्ये समाविष्ट करून घेतले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप करण्याचे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल, मोदींना देश तोडायचाय…

राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत केला. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, पंतप्रधान मोदी म्हणतात की पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर …

Read More »

राहुल गांधी यांची संपत्ती २० कोटी रूपयांपेक्षा जास्त उमेदवारी अर्जाच्या प्रतिज्ञा पत्रात दिलेल्या माहितीत उघड

वायनाडचे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना आपली संपत्ती जाहीर केली. वायनाडमधून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधी यांची एकूण संपत्ती २० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती बिझनेस स्टॅण्डर्डने आपल्या संकेतस्थळावर दिली. यापैकी राहुल गांधींकडे ९.२४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे आणि स्थावर …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे सूचक विधान, एकाबाजूला चीन अन्…

स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर या सरकारला आणि भाजपाच्या उमेदवाराला पाडा, तरच तुमचे स्वातंत्र्य अबाधित राहील. नाहीतर लोकशाहीची हुकूमशाही कधी होईल, हे सुध्दा कळणार नसल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. भाजपचा समाचार घेताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की, पाहिजे तेवढे …

Read More »

शरद पवार यांची टीका,… विरोधकांची मानसिकता दिसून येतेय

भाजपाचे शिरुर लोकसभा मतदारसंघात खेड आळंदीचे समन्वयक अतुल देशमुख यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. पक्षप्रवेशा दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, विविध राजकीय संघटनेमध्ये अतिशय …

Read More »

बीआरएस नेत्या के कविता यांच्या अडचणीत वाढ, आता सीबीआयची एन्ट्री

दिल्लीतील अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी ईडीने अर्थात सक्तवसुली संचालयाने पहिली धाड टाकत अटक केली ती बीआरएस (BRS) अर्थात भारत राष्ट्र समितीच्या नेत्या तथा आमदार के कविता यांना पहिल्यांदा अटक केली. परंतु आता याप्रकरणात सीबीआय (CBI) ने प्रवेश करत के कविता यांना दिल्ली अबकारी धोरण अर्थात दारू धोरणप्रकरणी अटक केल्याची माहिती काही …

Read More »