राजकारण

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी

भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता मित्रपक्षांना खायला निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजपा शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी …

Read More »

प्रताप सरनाईक यांचा स्लीपर(शयनयान ) बस प्रवाशांसाठी सुरक्षा इशारा “सजग प्रवासी, सुरक्षित प्रवास” कुर्नूल दुर्घटनेनंतर राज्य परिवहन महामंडळाची जनजागृती मोहीम सुरू

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे नुकतेच स्लीपर बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे एसटी महामंडळाने “शयनयान वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन” अभियान सुरू केले …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, जातीय आणि धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा भाजपा डाव भाजपा सरकार फक्त लाडके उद्योगपती व कंत्राटदारांचे

निवडणुका आल्या की भारतीय जनता पक्ष जातीय आणि धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवत असते. लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाजपा समाजात विष कालवण्याचे काम करत आहे. दिवाळीच्या आनंदाच्या सणातही भाजपा द्वेषाचे विष कालवत आहे. भाजपाच्या कटेंगे, बटेंगे, एक है तो सेफ है, अशा विषारी प्रचाराला बळू पडू नका, …

Read More »

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जनआक्रोश मोर्च्यास उसळला जनसागर आरएसएसचा भारतीय संविधान, तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टची प्रत स्वीकारण्यास नकार ; पोलिसांनी स्वीकारले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद शहरात ‘जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आरएसएसच्या कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही, हजारोंच्या संख्येने नागरिक यात सहभागी झाले आणि मोर्चा यशस्वी झाला. यावेळी, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, राज्य समिती …

Read More »

राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय राजभवन येथे नैसर्गिक शेती परिषदेत राज्यपाल बोलत होते

नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेतीपध्दत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजलपातळी वाढवते. नैसर्गिक शेती हा हवामान बदलाच्या संकटावर उपाय असून या शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन चांगले येते. जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या रक्षणाबरोबरच पर्यावरण, प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य, पाणी आणि माती या तिन्हींचे रक्षण करण्याची …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महिला डॉक्टरच्या आत्महत्येने गृह विभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला पोलिसांच्या अनन्वीत छळाला कंटाळून आत्महत्या कारावी लागली ही घटना पोलीस विभागाला लाज आणणारी आहे. गृहविभागावर फडणवीस यांचे नियंत्रण नाही, फलटणची घटना गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटावी आणि तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन …

Read More »

साखरवाडी आणि कुंजीरवाडी गावांना केंद्र सरकारकडून निधी सातारा आणि पुणे जिल्ह्याला जैवविविधता संवर्धनासाठी निधी

भारताच्या समृद्ध जैविक वारशाचे संरक्षण आणि स्थानिक समुदायांना त्यांच्या योगदानाचे फायदे मिळवून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील जैवविविधता संवर्धनासाठी १ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी जारी केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी आणि पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी या गावांना विशेष महत्त्व देण्यात …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा दावा, नैसर्गिक शेती हीच भविष्यातील क्रांती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राज्यपाल देवव्रत यांच्या उपक्रमाला पाठिंबा

नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी क्रांती घडेल आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन आपण सर्वांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्याचा संकल्प करूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राजभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या नैसर्गिक शेती परिषदेत एकनाथ शिंदे बोलत होते. या …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, बूथप्रमुखांचे एक लाख व्हाट्सअप ग्रुप पार्टी वॉररुमसोबत जोडलेले कार्यकर्त्यांशी संवाद व्हाट्सअप ग्रुपमधूनच, प्रत्येक जिल्ह्यात तीन नेत्यांची समिती

भाजपा बूथप्रमुखांचे एक लाख व्हाट्सअप ग्रुप पार्टीच्या वॉररुमसोबत जोडलेले आहेत. याबाबत ते सर्वजण अवगत आहेत. यामाध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोचवत असतो. पक्षामध्ये कार्यकर्त्यांसोबतचा संवाद याच व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होतो, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ग्रूपवर त्यावर आलेल्या कमेंट्स वाचून भूमिका ठरविली …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची ओळख सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहान मधील २२३ एकर भूखंडाचे हस्तांतरण

सोलर डिफेंस अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी अटी व शर्तीनुसार मिहानतर्फे २२३ एकर जागेचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. रामगिरी निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात मिहान प्रकल्पातील वैशिष्ट्यपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पासाठी जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री फडणवीस …

Read More »