राजकारण

कविवर्य राजा बढे यांचे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” आता राज्यगीत स्वतंत्र राज्यगीताला मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील तेरावे राज्य

कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून  अंगीकारण्यात येणार आहे.  या राज्यगीतासाठी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील …

Read More »

देशातील पहिला कॅनल जोड प्रकल्प सोलापूरात, केंद्राकडेही निधीसाठी प्रस्ताव नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता

नीरा-देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन निश्चित यशस्वी होईल. उर्वरित निधीकरीता केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल. यामुळे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी २२ गावांना पाणी मिळणार आहे. याबरोबरच फलटण आणि माळशिरस तालुक्यातील सुमारे २४ हजार ५२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. …

Read More »

काँग्रेसचा टोला, MPSC विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, भाजपाने फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय स्वागतार्ह

MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणा-या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या लढ्यापुढे अखेर सरकार झुकले असून नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष या निर्णयाचे स्वागत करत असून हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. भाजपाने याचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा खोचक टोला प्रदेश काँग्रेसचे …

Read More »

अजित पवार यांची मागणी, वाचाळवीरांना आवरण्यासाठी नवे धोरण आणि कायदा आणा शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी आणि कायदा व सुव्यवस्था यावरून लक्ष हटविण्यासाठी या गोष्टी केल्या जातायत

आम्ही सुरुवातीपासून सांगतोय महापुरुषांबद्दल सातत्याने अपमान करण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. त्यातून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आणि महत्वाचे मुद्दे महागाई, बेरोजगारी आणि आताच्या कायदा व सुव्यवस्था, शेतकर्‍यांचे प्रश्न या समस्या असतील या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. वास्तविक त्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये …

Read More »

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यशः बदलेला अभ्यासक्रम २०२५ पासूनच लागू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्राद्वारे विनंती

MPSC परिक्षेसाठी यंदाच्यावर्षी पासून बदलेला अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला. त्या विरोधात एमपीएससी परिक्षार्थी विद्यार्थ्यांकडून अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. त्यामुळे राज्य सरकारने अखेर बदलेला अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यासंदर्भातील विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात राज्य सरकारकडून जारी करण्यात …

Read More »

अजित पवारांनी साधला शिंदे-फडणवीसांवर निशाणा, खेळवतायत की चालढकल, की वेळ मारून नेतायत.. पत्रकार परिषदेत केला भाजपासह शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

राज्यातील सध्या विविध राजकिय प्रश्नावर आपली भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना कामासंदर्भात फोन करून वेळ मागतो, पण फोन केल्यावर …

Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या, देश बदलतोय… मोदी सरकारचे तोंड भरून कौतुक

भारताच्या राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मु यांची निवड झाल्यानंतर आजपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनानिमित्त राज्यसभा आणि लोकसभा सभागृहाच्या दोन्ही सदस्यांच्या संयुक्त बैठकीत अभिभाषण करताना राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या की, आपला देश बदलत असून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीमुळे आता लोकांचा भारताकडे दृष्टीकोन बदलतोय. आपण ज्याची कामना करत होतो तो आधुनिक भारत …

Read More »

विधान परिषदेसाठी नाशिक आणि अमरावतीत ४९ तर सर्वाधिक कोकणात मतदानाची टक्केवारी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. राज्यातील नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघात राजकिय चुरस निर्माण झाल्याने महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाकडून चांगलीच रंगत आणली. विशेषतः नाशिक मतदारसंघातील तांबे पिता-पुत्राने …

Read More »

सर्वपक्षिय खासदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केंद्राकडे प्रलंबित प्रस्तावांबाबत पाठपुरावा करा देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा बुलंद आवाज

संसद सदस्य हे राज्याच्या विकासासाठी झटणारे लोकप्रतिनिधी आहेत. आपले खासदार हे देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा आवाज आहेत. हा आवाज जितका बुलंद तेवढ्या विकासाच्या योजना, निधी राज्यात येईल. त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा. सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारी यंत्रणा उभी करतानाच महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्तांनी केंद्रीय मंत्रालय …

Read More »

शिंदे गटाने आयोगासमोरील लेखी युक्तीवादात केला दावा, राऊतांच्या धमक्यांमुळे आमदार पळून गेले आम्ही बंड नाही तर उठाव केल्याचा शिंदे गटाकडून लेखी निवेदनात उल्लेख

केंद्रिय निवडणूक आयोगापुढे ठाकरे विरूद्ध शिंदे गट आणि शिवसेना कुणाची हा वाद सुरू आहे. अशात आज (सोमवारी) लेखी युक्तिवाद दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात दावा दाखल केला आहे. या सगळ्यात लेखी युक्तिवादात संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाने मोठा आरोप केला आहे. निवडणूक आयोगात आता पुढे काय होणार? पक्ष आणि चिन्ह कुणाला …

Read More »