शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी-देवता आणि संतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली आहे. या विधानाचा निषेध नोंदविण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून आज १७ डिसेंबर रोजी ठाणे बंदची हाक दिली. या बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा, अखिल हिंदू समाज आणि हिंदूत्वादी संघटनांनी पाठींबा देऊ केला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडक पध्दतीने दिलगिरी व्यक्त केली जातेय सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या पक्षाला झालं तरी काय
महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढला जात आहे. तर दुसरीकडे या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया …
Read More »संजय राऊत म्हणाले, दिल्लीत गेले तेव्हा मेंदू गहणा ठेवले की काय? महाराष्ट्र प्रेम खोक्याकाली दबलं गेलंय
महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील राज्यपाल आणि भाजपाच्या मंत्री, आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सातत्याने महाराष्ट्र विरोधी केलेल्या वक्तव्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रवक्ते तथा खा. संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. …
Read More »आता चित्रा वाघ यांची मागणी, राज्यात लव्ह जिहाद कायदा यायलाच पाहिजे सुषमा अंधारे, संजय राऊत यांनी माफी मागावी
मागील काही महिन्यांपासून आंतरधर्मिय विवाह केलेल्या जोडप्यांमधील एकाची हत्या झाल्याच्या काही घटना उघडकीस आल्या. त्यानंतर भाजपा आमदार नीतेश राणे, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्या घटनांना लव्ह जिहादचा रंग देण्याचा प्रयत्न करत महाराष्ट्रातही या पध्दतीचा कायदा करण्याची मागणी केली. त्यावर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापणार रत्नागिरीच्या जिल्हा आढावा बैठकीत केली घोषणा
कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन व विकास करण्याचे काम हे प्राधिकरण करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा …
Read More »बच्चू कडू म्हणाले, …रट्टा दिला पाहिजे, बदली म्हणजे ते घरीच जातील राज्यपालांसह भाजपा नेत्यावर साधला निशाणा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली अवमानकारक वक्तव्ये, महाराष्ट्रातून अन्य राज्यात पळविले जाणारे प्रकल्प यांसह अनेक मुद्दय़ांवर महाविकास आघाडीतर्फे उद्या मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनीही या मोर्चासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान या मोर्चावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बच्चू …
Read More »संजय राऊत म्हणाले, त्यांच्या डोक्यात नेमके कोणते किडे वळवळतायत आघाडीच्या मोर्चात महाराष्ट्र प्रेमींनी सहभागी व्हावे
महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी १७ डिसेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढला जात आहे. भाजपाची काही नेतेमंडळी आणि खुद्द राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले वक्तव्य, बसवराज बोम्मईंची आक्रमक भूमिका आणि महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाणारे उद्योग यावरून सरकारविरोधी भावना व्यक्त होत आहे. त्यातच राज्यातील उद्योग गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न आणि महागाईच्या मुद्यावरही या …
Read More »शिंदे गटाचे मंत्री म्हणतात, नवीन वर्षात तुम्हाला नव्या घडामोडी आहेत त्या कळतील ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश
सध्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या मंत्री आणि आमदारांच्या विरोधात आधीच वातावरण तापलेले आहे. त्यातच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या सर्व घटनांच्या …
Read More »आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाल्यावर शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री शिंदेनी आधीच… देवेंद्र फडणवीसांनी आघाडीच्या मोर्चाला परवानगी दिल्यानंतर दिली प्रतिक्रिया
मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी आणि त्यानंतर भाजपा आमदार तथा मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्ये केली. त्यावरून राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले. यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. त्यातच कर्नाटकचे …
Read More »नाना पटोलेंचा पलटवार, प्रभूरामाच्या नावावर स्वतःचे खिशे भरणाऱ्यांनी हिंदू देवदेवतांवर बोलू नये भाजपाचे आंदोलन म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’
महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र विकास आघाडीच्या १७ तारखेच्या हल्लाबोल मोर्चाने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. जनतेत असलेला संताप या मोर्चातून व्यक्त होत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोर्चाच्या विरोधात आंदोलन काढण्याची नौटंकी भाजपा करत आहे. महापुरुषांचा सातत्याने अपमान करणाऱ्या भाजपाच्या वाचाळविरांविरोधात मूग मिळून गप्प बसणारे आता मात्र महापुरुष व …
Read More »
Marathi e-Batmya