राजकारण

भाजपा आमदाराचा गौप्यस्फोट, २५०० कोटी रूपयांच्या बदल्यात मला मुख्यमंत्री पदाची ऑफर काँग्रेसकडून चौकशीची मागणी

नवी दिल्लीतील काही लोकांनी २५०० कोटी रुपये भरल्यास त्यांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर घेऊन आले होते. त्यांनी मला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटींचे आश्वासन दिले होते असा गौप्यस्फोट कर्नाटकातील विजयपुरा येथील भाजपाचे विद्यमान आमदार बसनगौडा पाटील-यत्नल यांनी केला. भाजपाच्या आमदाराने …

Read More »

भाजपा आमदार शेलारांच्या आरोपांना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले “हे” उत्तर फडणवीस सरकारच्या निर्णयानुसार घेण्यात आला निर्णय

नुकतेच वांद्रे येथील बॅण्डस्टॅड येथील मोक्याचा भूखंड राज्य सरकारने नाममात्र किंमतीला एखा खाजगी विकासकाच्या घशात घातल्याचा आरोप भाजपा आमदार आशिष शेलार यांनी करत यात राज्य सरकारला झालेल्या नुकसानीची आकडेवारीही दिली होती. शेलार यांच्या आरोपाची दखल राज्य सरकारने गंभीरपणे घेतले असून शेलार यांच्या आरोपाला मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तरपणे दिले आहे. …

Read More »

आघाडी सरकारचा ओबीसींच्या संरक्षकाचा बुरखा फाडून खरा चेहरा बाहेर आणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा ओबीसी मोर्चाला संदेश

महाविकास आघाडी सरकारमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असून ते पुन्हा मिळेपर्यंत राज्य सरकारबरोबर संघर्ष चालूच ठेवावा व त्यासोबत ओबीसी समाजाच्या शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांसाठीही ओबीसी मोर्चाने संघर्ष करावा, असा संदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिला. भाजपाच्या ओबीसी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी बैठक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश …

Read More »

संजय निरूपम म्हणाले, राज्य सरकारला राज ठाकरेंची भीती वाटते अजामीनपात्र वॉरंट असूनही कारवाई करत नाही

महाराष्ट्र पोलिसांनी औरंगाबाद येथील सभेसाठी १६ अटी घातल्या होत्या. त्यापैकी १२ अटींचे उल्लंघन केले आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात दोन न्यायालयांचे अजामीनपात्र वॉरंट आहेत. मुंबई पोलीस काहीच का करत नाहीत? हे मला समजत नाही. सरकारला राज ठाकरेंची भीती वाटत आहे असे खळबळजनक विधान काँग्रेस नेते संजय निरुपम केले. द प्रिंन्टच्या …

Read More »

ओबीसी आरक्षणावरील फडणवीसांचे बोल म्हणजे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ ओबीसींच्या आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा व फडणवीस सरकारच !: नाना पटोले

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर भारतीय जनता पक्षाला आता आलेला कळवळा हा केवळ दिखावा आहे. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. भाजपाचा डिएनए ओबीसी नसून ओबीसीविरोधी आहे आणि आता ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपा दाखवत असलेले प्रेम हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे, असा प्रहार …

Read More »

कार्यक्रमात फ्लॉवर पॉट असतो अन् त्याच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीची दुकानदारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

ओबीसी आरक्षणाकरता आमचा लढा शेवटपर्यंत सुरु ठेवणार आहोत. कुठलीही किंमत मोजावी लागली तरी भाजपा ओबीसी आरक्षणाचा लढा लढत राहील. तो पर्यंत २७ टक्के तिकिटे आम्ही ओबीसींना देणार हा भाजपाचा निर्धार आहे. भाजपा हा पक्ष ओबीसींच्या विश्वासावर मोठा झाला असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगत आम्ही केवळ अलंकारिक पद्धतीने ओबीसींना …

Read More »

राऊतांचा मनसेवर निशाणा साधत भाजपाला आव्हान पोलिसांच्या भीतीने भोंगे गायब झाले, महागाईवर बोला

मागील काही दिवसांपासून राज्यात मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे, भाजपाने राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतानाच आज शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मनसेवर टीकेची झोड उठवित भाजपाला महागाईच्या मुद्यावरून बोलण्याचे आव्हान दिले. महाराष्ट्रात पोलिसांच्या भीतीने सर्व राजकीय भोंगे गायब झाले, असे सांगत त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. खरंतर …

Read More »

अजित पवारांचा टोला, काही नेते घोषणा करतात आणि घरात जावून बसतात अन्… मनसेप्रमुख राज ठाकरेंवर साधला निशाणा

मागील महिन्यापासून मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत संघर्षाची भूमिका स्विकारली. मात्र त्यांच्या आक्रमक भूमिकेचा सर्वाधिक फटका हिंदू धर्मियांच्या मंदिरांना आणि कार्यक्रमांना बसला. तरीही मनसे कडून मस्जिदींवरील भोंग्यावरून अद्यापही आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज ठाकरेंवर पुन्हा एकदा …

Read More »

न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली निवडणूकीची प्रक्रिया नगरपरिषद/नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांसाठी १४ मे पर्यंत मुदत

काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षण आणि कोरोनामुळे रखडलेल्या स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणूका प्रलंबित राहीलेल्या आहेत. मात्र त्याविषयीची प्रक्रिया दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर अखेर राज्य निवडणूक आयोगाने या निवडणूका घेण्याच्या अनुषंगाने निवडणूकीच्या अनुषंगाने प्रक्रिया सुरु केली. या पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेत राज्यातील २१६ नगर परिषदा-नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेसंदर्भातील हरकती व …

Read More »

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांच्या सुविधेसाठी लाल परीचे नियेाजन करा मंत्री, ॲड. अनिल परब यांचे निर्देश

कोरोना आणि संप या पार्श्वभूमिवर एसटी महामंडळ गेल्या दोन वर्षात एका वेगळ्याच परिस्थितीशी झुंज देत होते. या काळात जो विस्कळीतपणा आलेला आहे तो दूर करून उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी वाहतूकीचे नियोजन करा, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी विभाग नियंत्रकांना दिले. …

Read More »