राजकारण

देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत फोडला बॉम्ब, उघडकीस आणले कट कारस्थान गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेकांच्या विरोधात आखले होते कट कारस्थान

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विरोधकांना संपविण्यासाठी कट कारस्थान करण्यात येत असून यात विशेष सरकारी वकील चव्हाण हा सहभागी असल्याचा खळबळजनक दावा या चव्हाणने जळगांव मधील जे पूर्वी भाजपामध्ये होते मात्र आता ते तुमच्या पक्षात नेते आलेले त्यांच्या मदतीने भाजपा आमदार गिरीष महाजन यांना मोक्का कायद्याखाली गुंतविण्याच्या कटाचा भंडाफोड विरोधी …

Read More »

संजय राऊतांचा आरोप, “भाजपाची एटीएम मशीन म्हणजे ईडी” शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आरोप

सकाळपासून आमच्या कार्यकर्त्यांवर प्राप्तिकर विभागाची धाड पडल्याच पाहत आहे. महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत मुंबईच्या प्रत्येक विभागात आणि शाखेत प्राप्तिकर विभागाची धाड पडेल असे मला वाटत आहे. आता या विभागाकडे हेच काम शिल्लक राहिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये फक्त ठराविक लोकांनाच लक्ष का करत आहे प्रश्न देशभरातून …

Read More »

नाना पटोलेंचा सवाल सरकारी नोकर भरती कधी ? मंत्री भरणेंनी दिले हे उत्तर… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा महाविकास आघाडीला सवाल

Nana Patole

राज्यात विविध विभागात लाखो पदे रिक्त असून मागील पाच सहा वर्षात सरकारी नोकर भरती झालेली नाही. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला. विधानसभेत …

Read More »

कनाल- कदमावरील छापेमारीवर आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंची टोलेबाजी नाईट लाईफच्या गँगना झोप लागणार नाही नितेश राणेंचे ट्विट

सकाळी दिवस उजाडताच आयकर विभागाने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल कनाल आणि संजय कदम यांच्या घरावर धाड सत्र सुरु झाले. या धाडसत्रानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात अप्रत्यक्षरित्या एकमेकांवर निशाणा साधण्यास सुरुवात झाली. भाजपाकडून या कारवाईचं समर्थन केले जात …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार ? सभापती नाईक-निंबाळकरांनी दिले चर्चेचे आदेश विधान परिषदेतील लक्षवेधीवरील चर्चेवेळी सभापतींचे आदेश

मागील चार महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. तसेच मागील दोन दिवसात एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण शक्य नसल्याचा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल राज्य सरकारने मंजूर केलेला अहवालही विधानसभेत मांडला. तरी देखील हे आंदोलन संपले नसल्याने अखेर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांनी …

Read More »

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्य सरकारने पारीत केलेले “ते” विधेयकच घटनाबाह्य महाविकास आघाडीचे सरकार हे चोरांचे सरकार

राज्यातील ओबीसी समाजाचे गेलेले राजकिय आरक्षण परत मिळविण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व माहिती गोळा करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना असलेले निवडणूक घेण्याचे अधिकार महाविकास आघाडी सरकारने १९६५ च्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आण मुंबई महापालिका कायदा १९६५ अधिनियमात दुरूस्ती करत सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात नुकताच …

Read More »

सरकारच्या आधीच फडणवीसांकडून मोठी घोषणा, कोरोना गेला आता मास्कही… सरकारच्या घोषणे आधी फडणवीसांनी केली घोषणा

राज्य विधिमंडऴाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विविध प्रश्नांवरून सध्या सभागृहात चर्चा सुरु आहे. राज्यातील लोक कलावंताना कोरोना काळात करण्यात आलेल्या मदतीच्या अनुषंगाने पुकारण्यात आलेल्या लक्षवेधीवरील चर्चेवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले असून कोरोना गेल्याचे वक्तव्य केले. विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर लक्षवेधी पुकारण्यात आली. त्यावेळी …

Read More »

जिल्हा रुग्णालय व नगरपालिकांना शव वाहिका उपलब्ध करुन देणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक घेणार

नगरपालिकेने शव वाहिका उपलब्ध करुन देणे हा त्यांचा जबाबदारीचा विषय आहे. मोठ्या महानगरपालिकेमध्ये शव वाहिका उपलब्ध आहेत. नगरपालिकामध्ये शव वाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल. तसेच जिल्हा रुग्णालय व नगरपालिकांना शव वाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी नगरविकास विभागाला विनंती करु, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी …

Read More »

गृहमंत्र्याची घोषणा, बीड जिल्ह्याचे एसपी सक्तीच्या रजेवर १५ दिवसात सर्व आमदारांची बैठक घेवून पुढील कारवाई

बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके, संदिप क्षिरसागर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार नमिता मुंदडा यांनीही काही गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. यावर उत्तर देत असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बीड जिल्ह्याचे एसपी यांना रजेवर पाठवण्याचा कडक निर्णय विधानसभेत जाहीर केला. दरम्यानच्या काळात बीड …

Read More »

न्यायालयाच्या निर्देशानुसार फक्त “या” पाच महापालिकांच्या निवडणूका आयोग घेणार नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकांचा समावेश

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी समाजाचे गेलेले आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी राज्य सरकारने कायदेशीर लढण्याच्या अनुषंगाने तयारी केलेली असतानाच तो पर्यंत या निवडणूका होवू नये यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम आणि मुंबई महापालिका अधिनियम १९६५ या कायद्यात सुधारणा करत निवडणूकीचे सर्वाधिकार राज्य सरकारने स्वतःकेड घेतले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मुदत संपून …

Read More »