राजकारण

राज्यपालांच्या उपस्थितीतच त्यांचीच तक्रार अजित पवारांनी केली पंतप्रधानांकडे मोठ्या व्यक्तींकडून नको ती वक्तव्य केली जातात ती न पटणारी असतात

पुणे मेट्रो आणि १४० ईलेक्ट्रीक बसेससह इतर महत्वाच्या योजनांचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या वादग्रस्त वक्तव्याची तक्रार करत टोला लगावला. एमआयटी काँलेजच्या मैदानावर आयोजित …

Read More »

शरद पवारांच्या टीकेला पंतप्रधान मोदींचे वाराणसीच्या प्रचारसभेतून उत्तर युक्रेनच्या संकट काळातही विरोधकांकडून राजकारण

युक्रेनच्या विरोधात रशियाने सुरु केलेल्या लष्करी कारवाईमुळे हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती बाहेर आल्यानंतर या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात केंद्र सरकारला अपयश येताना दिसत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे येथील मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत असल्याच्या यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्घाटन सोहळ्यांबरोबर युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी …

Read More »

राज्यपालांवरील शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांनी दिले “हे” उत्तर राज्यपाल हटाव मोहिमच दिसतेय

राज्यात महाविकास आघाडी सरकार विरूध्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असा संघर्ष सातत्याने बघायला मिळत आहे. मात्र हा संघर्ष दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी या ना त्या कारणाने या भरच पडत असल्याचे दिसून येत आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय …

Read More »

सुरज जाधव याच्या आत्महत्येतून ऊर्जा मंत्रालय धडा घेणार का ? आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील सुरज जाधव या तरूण शेतकऱ्यांने शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा येणार नाही असे म्हणत आपलं जीवन संपवले. या दुर्घटनेनंतर भाजपा आमदार तथा राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या ऊर्जा विभागावर टीका करत वीज तोडणी, जादा वीजबिल आकारणीला कंटाळून पंढरपुरातील तरुण शेतकऱ्याने जीवन संपविले. शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा …

Read More »

फोन टॅपिंगचे आदेश देणारे रश्मी शुक्लांचे ‘बिग बॉस’ कोण? बेकायदेशीर फोन टॅप करणाऱ्या रश्मी शुक्ला यांच्यावर तातडीने कारवाई करा

वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर अशाच पद्धतीच्या प्रकरणात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. महाविकास आघाडी सरकारने आता कोणतीही दिरंगाई न करता तातडीने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी करत रश्मी …

Read More »

मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून शरद पवारांनी दिला नारायण राणेंचा दाखला चुकीच्या पध्दतीने व राजकीय हेतूने कारवाई, पण बाहेर आणण्यासाठी संघर्ष करत राहणार- शरद पवार

कुर्ला येथील जमिन खरेदीप्रकरणात तब्बल २० वर्षानंतर ईडीने कारवाई करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. मलिक यांच्या अटकेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी भाष्य केले. मात्र नवाब मलिक यांच्या अटकेवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया …

Read More »

आदित्य ठाकरेंच्या कार्यालयाचे आदेश, राजाराम साखर कारखान्याचे उत्पादन बंद सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेत त्रुटी आढळल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यकारी व्यवस्थापन व देखभाल यंत्रणा समाधानकारक नसल्याने श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाने दिले आहेत. पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याने स्थानिक पातळीवर प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत पाहणी करण्यात आली. यानंतर सुनावणी घेण्यात येऊन त्रुटी आढळल्यानुसार हे …

Read More »

शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारला मान्य करायला लावू माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावीत, दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय रद्द करून एकरकमी एफआरपी द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रु. प्रोत्साहनपर अनुदान द्यावे आदी मागण्या विधिमंडळात सरकारला मान्य करण्यास भाग पाडू, असा निर्धार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश किसान मोर्चाने शेतकऱ्यांच्या …

Read More »

एसटी प्रश्नी अजित पवार म्हणाले, कुणीही राज्यकर्ते असले तरी… ओबीसींचा लोकप्रतिनिधीत्व करण्याचा अधिकार हिरावून घेता कामा नये म्हणून राज्य सरकार आग्रही

आजूबाजूच्या राज्यातील एसटीचा विचार करता जेवढं देणं शक्य होतं तेवढं देण्याचा प्रयत्न परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन घेतलेला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत एसटी कर्मचारी एसटीचे विलिनीकरणच पाहिजे अशी मागणी करत होते. त्यांना प्रत्येकाने अशी भूमिका घेतली तर कुणीही राज्यकर्ते असले तरी त्यांना ती न …

Read More »

“या” कारणासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करा

मागील पावसाळी अधिवेशना दरम्यान रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूकीची तारीखच निश्चित केली नाही. त्यामुळे गतवेळी अध्यक्ष पदाची निवडणूक घेता आली नाही. त्यातच राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान झालेल्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी अर्धवटच भाषण केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये पुन्हा एकदा …

Read More »