ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन, अधिकाऱ्यांनी पदरचे ५० हजार खर्च करून आरक्षण वाचवा आरक्षण वाचवण्यासाठी 'वंचित'ला मतदान करा

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या क्रिमीलेयरबाबतच्या आदेशाबाबत तमाम फुले शाहू आंबेडकवादी विचारांच्या अधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन करत म्हणाले की, निवडणुकीमध्ये आपल्या पदरचे पन्नास हजार रुपये खर्च करून आपल्या मुलाबाळांचं आरक्षण वाचवा. वंचित बहुजन आघाडीला मतदान देऊन हे आरक्षण आपण वाचवाल अशी अपेक्षाही व्यक्त केली.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने एससी, एसटी आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमीलेअर हा निर्णय लागू करण्यासाठी एका निवृत न्यायाधीशाची नेमणूक केली आहे. बार्टीच्या एका अधिकाऱ्याला सचिव म्हणून नेमले आहे, त्यांचा अहवाल सादर केला जाईल. अहवाल एकदा सादर झाला की सर्वोच्च न्यायालयाचा उपवर्गीकरण आणि क्रिमीलेअरचा निर्णय लागू होईल. हा निर्णय लागू झाला तर एससी, एसटी अधिकाऱ्यांच्या मुलाला मुलीला आणि कुटुंबाला आरक्षण मिळणार नाही. हे त्यांनी समजून घ्यावे आरक्षण वाचवणे हा निवडणुकीचा मुद्दा आपण केला पाहिजे, म्हणून या सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःचे पन्नास हजार रुपये खर्च केले पाहिजे.

शेवटी बोलता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, निवडणुकीत प्रचार करण्यासाठी किंवा मतदान आपल्याकडे वळविण्यासाठी कशा पद्धतीने वळवायचं याची आपल्याला अधिक जाणीव आहे. उद्याचे आमदार निवडून आले तर हा निर्णय अंमलबजावणी करण्यापासून थांबवता येईल, असेही ट्विटच्या माध्यमातून सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *