संजय राऊत यांचा खोचक सवाल, बावनकुळे राज्यपाल आहेत का, की राज्यपालांनी सांगितलय सत्ता स्थापनेचा दावा न करताच शपथविधीचा कार्यक्रम

राज्यातील संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती कडून अद्याप सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला किंवा मुख्यमंत्री पदासाठी अधिकृत नावाची घोषणा केलेली नसतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याची घोषणा काल संध्याकाळी केली. त्यावरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना खोचक सवाल करत बावनकुळे राज्यपाल आहे का की राज्यपालांनी तसे बावनकुळे यांना सांगितले असा खोचक सवाल करत अजून सत्ता स्थापनेचा दावा केलेला नसताना थेट शपथविधीचा कार्यक्रम कसा काय जाहिर करू शकतात अशी खोचक टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, पाच तारखेला शपथविधी होईल हे सांगायला चंद्रशेखर बावनकुळे हे काय राज्यपाल आहे का असा सवाल करत असे जाहिर करण्याचा अधिकार कोणी दिला. की राज्यपालांनी त्यांना सांगितले आहे का अशी प्रश्नांची सरबती करत एकीकडे हे महायुतीवाले सत्ता स्थापनेचा दावा करायला तयार नाहीत. तर दुसऱ्याबाजूला बावनकुळे पाच तारखेला शपथविधी असल्याचे जाहिर करून मोकळे झालेत. मला एक कळत नाही की हे लोक घाबरतात का असा सावल करत राज्यात खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यघटनेचा मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या सगळ्याला माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड जबाबदार असल्याचेही यावेळी सांगितले.
तसेच संजय राऊत यांनी यावेळी बोलताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, राज्याचे काळजीवाहू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारपणामुळे त्यांच्या दरे या गावी गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या हाताला पट्टी वैगरे बांधून बसले आहेत असं समजतं. त्यामुळे त्यांची प्रकृती खुप नाजूक असल्याचं बोललं जात असून त्यांच्या तेथील डॉक्टरही तपासणीसाठी गेले होते. मात्र एकनाथ शिंदे यांना कोणत्या डॉक्टरांची गरज आहे की कोण्या डॉक्टर मांत्रिकाची गरज आहे हे आम्हाला माहित असल्याची खोचक टीकाही यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल संध्याकाळी एक्स वर पोस्ट करत राज्यातील महायुतीचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी होणार असल्याची घोषणा करत दोन दिवसात दिल्लीतील केंद्रीय निरिक्षण येऊन मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय जाहिर करणार असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव प्रदेश काँग्रेस मुख्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत धर्मांमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *