अब्दुल सत्तारांचे आदित्य ठाकरेंना आव्हान, दोन अडीच वर्षे कशाला मी आताच राजीनामा देतो… त्यांच्याही आणि त्यांच्या वडीलांचा दौरा पाहिला...

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार संबोधत आव्हान देत म्हणाले की, तुम्हीही राजीनामा द्या मी ही राजीनामा देतो एकदा होवूनच जाऊ द्या असे थेट आव्हान दिले होते. तसेच लोकांच्या दरबारातच निर्णय होईल असेही म्हणाले होते. त्यावर आज मंगळवारी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना प्रतिआव्हान देत चला मी राजीनामा देतो तुम्ही वरळीतून राजीनामा द्या असे आव्हानच दिले.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे प्रसार माध्यमांशई बोलत होते. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांना प्रतिआव्हान दिले.

यावेळी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, मी आदित्य ठाकरेंचा दौरा पाहिला, त्यांच्या वडिलांचाही दौरा पाहिला, अडीच तासांचा दौरा आणि त्यामध्ये २४ मिनिटे शेतकऱ्यांच्या बांधावर. आम्ही २४ दिवसांपासून फिरत आहोत. परंतु ओल्या दुष्काळाची परिस्थिती आतापर्यंत आम्हाला दिसली नाही. त्यांना २४ मिनिटांमध्ये काय दिसलं असेल मला माहीत नाही. परंतु राजकारणासाठी बांधावर जाऊन फोटो काढणं वेगळं आहे आणि शेतकऱ्यांच्या मनापर्यंत जाणं वेगळं असतं.
याचबरोबर शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना आदित्य ठाकरेंकडून सातत्याने गद्दार संबोधले जात असून, हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढा, असं आव्हान दिलं जातं. या

पार्श्वभूमीवर सिल्लोडमधून मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि आदित्य ठाकरेंनी वरळीमधून राजीनामा द्यावा, असे आव्हान दिले.
माझं आवाहन हे मुख्यमंत्र्यांकडे काही वेळेसाठी अडलेलं आहे. त्यांना(आदित्य ठाकरेंना) मी म्हणालो होतो की तुम्ही तिथून राजीनामा द्या, मी सिल्लोडमधून राजीनामा देतो. त्याचं वक्तव्य होतं की, तुम्हाला दोन वर्षानंतर माहीत पडले की निवडणूक काय असते. मी म्हणालो दोन वर्षे कशाला वाट बघता, पहिले आपल्या दोघांची ट्रायल मॅच होऊ द्या. तुम्ही तिकडून राजीनामा द्या, मीपण राजीनामा देतो आणि ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ लगेच होईल. अजूनही आपलं आव्हान आहे आणि त्यांनी नाही दिला तरी मला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली. तर आठवभराच्या आत तुम्हाला वृत्तवाहिनीवर माझी बातमी दिसेल असेही ते म्हणाले.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि फलोत्पादनमंत्री संदीपान भूमरे यांच्या उपस्थितीत वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था पुणे येथे हॉर्टिकल्चर व्हॅल्यू चेन फंक्शन या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्धाटन तोमर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी वरील प्रमाणे आव्हान दिले.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *