सुनिल तटकरे आणि सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात रायगड आणि बारामतीचे मतदान होणार असून उद्या या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेचे केले असून या मतदारसंघाकडे अख्खा महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

उद्या रायगड येथे खासदार सुनिल तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तर बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि महायुतीचे नेते आदींसह सर्व आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *