राज्यात कधी नव्हे इतका व्हिआयपी खटला वाल्मिक कराड यांच्या निमित्ताने बनला आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात न्याय मागण्यासाठी मराठवाड्यातील सर्व पक्षिय आमदार आणि नेते रस्त्यावर उतरल्यानंतर आता बीड जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती पहायला मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर काल मकोका कायदा लागू केल्यानंतर कालपासून परळीमध्ये वाल्मिक कराड च्या समर्थकांकडून ठिय्या आणि धरणे आंदोलन सुरु केले आहे. आज दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन कराड समर्थकांकडून असेच सुरु राहिले. कराड समर्थकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी टीका करत परळीत नवा पॅटर्न निर्माण झाला असून या प्रकरणी राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला सांगा असे आव्हानही यावेळी दिले.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, आरोपीसाठी शहर बंद ठेवायचं, दुकानं बंद करायची, आरडाओरडा करायचं असा नवा परळी पॅटर्न आता सुरू झाला आहे. याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुन्नीला बोलायला लावा असेही यावेळी आव्हान दिले.
सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले की, नाविन्यपूर्ण योजना ही परळीचा पॅटर्न महाराष्ट्राने पहावा. कारण कोणत्याही आरोपीला अटक केल्यानंतर किंवा पोलिसांनी ताब्यात घेतलं तर शहर बंद करायचं आरडाओरड करायचा, दुकाने बंद करायची असा नवीन पॅटर्न कालपासून परळीत सुरु झाला. अशा प्रकारच्या दबावाला कोण घाबरतं असा सवाल उपस्थित करत व्यापारी त्याचं स्वतःचच नुकसान करून घेत आहेत. हा जातीयवाद नव्हे तर गुंडा वाद असल्याची टीकाही यावेळी केली.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, वाल्मिक कराडला माननारे ४ ते ५ टक्के लोकांचा हा गुंड वाद आहे. त्यामुळे जातीय वाद हा शब्द वापरला नाही पाहिजे. आता बीडमध्ये कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षकांनी काय काय कारवाई केली ते विचारणार असल्याचेही यावेळी सांगितले.
तसेच यावेळी वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांनी या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबधित काही प्रश्न उपस्थित करत हत्येचा संबध का जोडत आहात आमच्या समाजाला संपवायच आहे का असा सवालही यावेळी उपस्थित केला.
त्याबाबत सुरेश धस म्हणाले की, मी त्या माऊलीच्या विरोधात बोलणार नाही. कारण एखाद्या महिलेबाबतीत बोललं की मुद्दा भरकटला जातो. मात्र माझी विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार यांच्या पक्षाच्या) लोकांना सांगा की मुख्य मुन्नीला बोलायला लावा, यामध्ये अजून बरंच काही आहे, आता आका सापडला आहे, तर आकाच्या पुढे काही आणखी कडी सापडेय का ते पहावं लागेल आकाच्या वरची माणसंही यात सापडणार असल्याचा सूचक इशाराही यावेळी दिला.
Marathi e-Batmya