रात्री २ वाजता मरकजमध्ये राष्ट्रीय सल्लागार अजित डोवल काय करत होते? राज्याचे गृहमंत्री देशमुख यांचा केंद्रीय गृहमंत्री शाह यांना सवाल

मुंबई: विशेष प्रतिनिधी

कोरोना आजाराचे संकट घोंघावत असताना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवी दिल्ली येथे झालेल्या निझामुद्दीन मरकजमधील तब्लीगीच्या आयोजनाला परवानगी का देण्यात आली ? असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित करत याच मरकजमध्ये रात्री २ वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि तब्लीगीचे पुढारी मौलाना हे कोणती गुप्त चर्चा करत होते असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केला.

यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही प्रश्न विचारले असून या प्रश्नांची उत्तरे कोण देणार असा सवालही उपस्थित केला.

दिल्लीतील मरकजच्या बाजूलाच निझामुद्दीन पोलिस स्टेशन आहे. तरी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली नाही उलट परवानगी देण्यात आल्याने कोरोनाचा आजार मोठ्या प्रमाणावर पसरला. यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची नाही का असा खोचक सवालही त्यांनी आयुक्तांचे आहे की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे आहे असा सवाल करत याप्रश्नी आतापर्यंत या दोघांनी भाष्य करण्याचे का टाळले असा सवाल उपस्थित करत या दोघांच्या भूमिकाबाबत संशय व्यक्त केला.

विशेष म्हणजे जब्लीगीचा नेता मौलाना साब अजित डोवल यांच्याबरोबर भेट झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गायब झाले. ते अद्याप फरार असून यासंपूर्ण प्रकरणात केंद्राचे सारेच वर्तन संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची मागणी, कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करा आणि नुकसान भरपाई द्या प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्या, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *