आदीवासी मुलांच्या लसीसाठी सिध्दीविनायक मंदीराकडून १० कोटी रूपये लसीकरण मोहिमेसाठी विशेष बाब म्हणून दिला निधी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील आदीवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली, नाशिक, पालघर, नंदूरबार आणि अमरावती जिल्ह्यातील आदीवासी बालकांचे न्युमोनियामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने या भागातील १ लाख ४० हजार २८७ बालकांना ४६२८८१ इतका अर्थात ४६ हजार न्युमोनियाचा प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्यासाठी सिध्दीविनायक मंदीर न्यासाने हा निधी विशेष बाब म्हणून दिल्याची माहिती राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली.
या न्युमोनिया लसीसाठी प्रति लस २०० रूपये या दराने आकारण्यात येणार असून ४६ हजार लसींसाठी ९ कोटी २६ लाख रूपयांचा खर्च येणार आहे. तसेच प्रसिध्दीसाठी १० लाख तर प्रशिक्षणासाठी २६.३२ लाख रूपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी सिध्दीविनायक मंदीराकडून १० कोटी रूपयांचा विशेष निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी न्युमोकोकल ही लस खरेदी करून ती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवर संधी द्या

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेल प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *