महाराष्ट्राच्या राजकारणा ठाकरे कुंटुंबियाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्या ठाकरे कुटुंबियांमधील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावे म्हणून राज्यातील ठाकरे प्रेमींची इच्छा होती. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकियदृष्ट्या एकत्र येत तशी घोषणाही केली. त्याचबरोबर आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तशी अधिकृत घोषणा लवकरच करणार असल्याचे संकेत दोन्ही ठाकरे बंधूनी दिले आहेत. मात्र दिवाळी निमित्त राज ठाकरे यांची बहिण जयवंती देशपांडे यांच्या घरी भाऊबीज पार पडली. यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे दोन्ही कुटुंबिय हजर होते.
जयंती देशपांडे या राज ठाकरे यांची सख्खी बहिण आहेत. उद्धव ठाकरे हे चुलत भाऊ आहेत. आज भाऊबीजेच्या निमित्ताने राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे आदित्य ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब जयवंती देशपांडेच्या घरी एकत्र जमा आले. भाऊबीज झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर परतले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भाऊबीजेच्या निमित्ताने नवव्यांदा भेट झाली आहे.
ठाकरे बंधू यांच्या भेटीवर राजकिय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांकडून या भेटीवर टीका करण्यात येत आहे. तर काही जणांकडून दोन बंधू एकत्र येत असल्याबाबत चांगले मत व्यक्त केले. मात्र मुंबई महापालिका भाजपा महायुतीच जिंकेल असा विश्वास देखील विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे ही एकत्र
दिवाळी भाऊबीजेनिमित्त आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे हे स्नेहभोजना निमित्त एकत्र आल्याचे दिसून आले. या दोन्ही कुटुंबियातील स्नेहबंध महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळेच आता ठाकरे बंधूची युतीची औपचारीक घोषणा कधी होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे.
राज्य सरकारने राज्यात हिंदी भाषेची सक्ती लागू केल्यानंतर ५ जुलै २०२५ रोजीच्या मराठी भाषेच्या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले. या मेळाव्यानंतर राज आणि उद्धव यांच्यातील जवळीक वाढली. आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या घरी पोहचले. त्यानंतर या भेटीगाढी वाढल्याचे चित्र पाह्यला मिळाले.
दरम्यान, शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे ठाकरे हा महाराष्ट्रातल्या राजकारणातील ब्रॅण्ड आहे. ५ जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून दोन्ही भावांची युती होईल अशी चर्चा आहे. दोन्ही ठाकरे यांनी तशी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी दोघांकडून युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे संकेत यापूर्वीच अनेक वेळी दोन्ही ठाकरे बंधूनी दिलेले आहेत.
Marathi e-Batmya