२३ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात कार्यान्वित झालेल्या बाल न्याय अधिनियमातील नवीन बदलानुसार भारतातील पहिले दत्तक विधान आज अहमदनगर मध्ये संपन्न झाले. स्नेहालय संचालित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राने यासंदर्भात पथदर्शी काम केले. भारतातील दत्तक विधान प्रक्रियेला मोठा ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा आहे. तथापी समाजात दत्तक विधानाबद्दल अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा होत्या. …
Read More »शरद पवार म्हणाले, त्या अमानवी गोष्टींना तथागत गौतम बुध्दांनी विरोध करत… सत्यशोधक समाजाचे विचारच देशाला जातीपातीच्या व धर्मभेदाच्या यादवीतून वाचवू शकतात - छगन भुजबळ
महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले हे विज्ञानाचे, आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. त्याचं हे काम पुढे नेन्याचे काम हे अतिशय चिकाटीचं आहे, गरजेचे आहे. कारण महात्मा महात्मा फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा व त्यांच्या दु:खांची मांडणी करणारा विचार …
Read More »नवरात्र उत्सव मंडळांनो अधिकृत वीजजोडणी घ्या अन् अपघात टाळा अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन
सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे. नवरात्र उत्सव २६ सप्टेंबरपासून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महावितरणकडून नवरात्र उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या …
Read More »पंढरपूरच्या विकास आराखड्यात सहभागी होण्याची संधी विकास आराखड्याबाबत 26 सप्टेंबरपर्यंत लेखी सूचना द्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडयामध्ये समाविष्ट कामाबाबत १२ सप्टेंबर २०२२ रोजी खासदार, आमदार, मंदीर समितीचे विश्वस्त, पालखी सोहळयाचे विश्वस्त, व्यापारी प्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. आराखड्याबाबत आणखी काही सूचना असतील तर लेखी स्वरूपात 26 सप्टेंबर २०२२ पर्यंत देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. आराखड्याबाबत लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पालखी …
Read More »निवडूण आलेल्या महिलांची ग्वाही, आम्हीही देऊ गावाच्या विकासात योगदान ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या प्रशिक्षणानंतरच्या भावना
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हीही गावाच्या विकासात योगदान देऊ शकतो आणि डिजिटल कारभारातही आम्ही मागे राहणार नाही. सरपंचासाठी असलेल्या डिजिटल सहीचा दक्षतापूर्व व प्रभावीपणे वापर करु, असा विश्वास राज्यातील ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षणानंतर अनेक महिला सदस्यांनी व्यक्त केला. विविध जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतीच्या जानेवारी २०२१ मध्ये निवडणुका पार पडल्या. यात …
Read More »महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ मुंबईतील एक तर बीडमधील दोन शिक्षकांना राष्ट्रपतींकडून प्रदान
महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. यामध्ये मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता सांघवी, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील …
Read More »मुख्य सरन्यायाधीश एन व्ही रमणा म्हणाले, तेव्हाच ही व्यवस्था खऱ्या अर्थाने लोकांची बार असोसिएशनच्या कार्यक्रमात व्यक्त केले मत
फक्त वसाहतवादापासून मुक्ततेसाठी स्वातंत्र्यलढा लढला गेला नव्हता. तर हा लढा सर्वांच्या सन्मानासाठी तसेच लोकशाहीची स्थापना करण्यासाठी लढण्यात आला होता. लोकाशाहीचा पाया रचण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून झाले. संविधान सभेमध्ये सखोल विचारविनिमय करून आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असलेल्या भारतीय संविधान संविधानाची निर्मिती झाली. मात्र आपण जेव्हा एकमेकांचा तसेच देशातील विविधतेचा सन्मान करू …
Read More »नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांनो भाड्याचे घर शोधताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच बोरिवली येथील शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन
नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता बोरिवली येथील वसतिगृहात शासनामार्फत मोफत निवासाची व्यवस्था करण्यात येते. या वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता इच्छुकांकडून १७ ते ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. वसतिगृहामधील प्रवेश नियमावली पुढील प्रमाणे आहे. अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, अर्जदार महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व जमाती, भटक्या …
Read More »परत एकदा पुणे, सोलापूरहून जाणाऱ्या रेल्वेचा ट्रॅफिक ब्लॉक मध्य रेल्वेकडून वेळापत्रक जाहिर
साधारणतः दोन महिन्यापूर्वी पुणे, दौंड मार्गे सोलापूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी ट्रॅफिक ब्लॉक मध्य रेल्वेने जाहिर केला होता. त्यानंतर मध्य रेल्वेने पुन्हा एकदा सोलापूर विभागाच्या दौंड ते कुर्डूवाडी विभागाच्या दरम्यान २५ जुलैपासून तांत्रिक कामांनिमित्त ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येत असल्याचे जाहिर केले. त्यामुळे या कामासाठी मुंबईसह सोलापूर, तसेच अन्य काही विभागांतील मेल, …
Read More »मतदार कार्डाशी आधार कार्ड जोडणे आवश्यक, पण नसेल तर ‘ही’ कागदपत्रे जोडा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन
मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने …
Read More »
Marathi e-Batmya