देहव्यापारातील भगिनींकडून पूरग्रस्तांना ११ हजाराची मदत स्नेहालयाच्या मदतीने भगिनीचा पुढाकार

अहमदनगर: प्रतिनिधी
देहव्यापारातील बळी महिलांतर्फे कोल्हापूर, सांगली ,बेळगाव भागातील पूरग्रस्तांसाठी आज ११ हजार रुपयांचा आर्थिक सहयोग देण्यात आला.यात ३ हजार रुपये रोख तर ८ हजार रुपये धनादेशाद्वारे शासनास देण्यात आले. यापूर्वी स्नेहालय-अनाम प्रेम परिवाराने पूरग्रस्त भागात २ ट्रकद्वारे पाठविलेल्या आणि वितरित केलेल्या वस्तुरूप सहयोगात ६० हजार रुपयांचा किराणा या महिलांनी दिलेला होता .
निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी शासनातर्फे या सहयोगाचा स्वीकार केला.
यावेळी स्नेहालयच्या विश्वस्त जया जोगदंड, संगीता शेलार, संघटक शारदा गौडा, मीना पाठक, सलमा शेख, रंजना रणनवरे ,बेबी शेख, प्रमिला म्हस्के, निर्मला साठे ,सरस्वती चौगुले, लताताई ढाकणे ,सुधाताई ब्राह्मणे ,मंगल बांबरकर, आदी उपस्थित होत्या.

About Editor

Check Also

राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर साहित्य अकादमीतर्फे २०२५चे पुरस्कार जाहिर

साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या  पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील मान्यताप्राप्त २४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *