डीजीएओची माहिती, भारतीय हवाई हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार आमचा हल्ला पाकिस्तान, तेथील नागरिक किंवा देशाशी नव्हता तर दहशतवाद्यांच्या विरोधात होता

ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या लष्करी हल्ल्याला उधळून लावत भारताने अनेक उच्च तंत्रज्ञानाची पाकिस्तानी विमाने पाडली आहेत, असे हवाई ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएओ) यांनी रविवारी सांगितले.

अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीची घोषणा काल करण्यात आली. त्यानंतर ७ मे ला भारतीय हवाई दलाने मध्यरात्रीनंतर दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याची आणि एकूणच घटनाक्रमांची माहिती आज भारतीय डिजीएओने आज दिली. यावेळी तिन्ही दलाचे प्रमुख आणि डिजीएओचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एअर मार्शल ए के भारती यांनी सांगितले की, त्यांच्या विमानांना आपल्या सीमेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले… निश्चितच, आम्ही काही विमाने पाडली आहेत… निश्चितच, त्यांच्या बाजूने काही नुकसान झाले आहे जे आम्ही केले असल्याचे सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर भारताच्या प्रत्युत्तर कारवाईवरील ऑपरेशन सिंदूरवरील विशेष ब्रीफिंग दरम्यान सांगितले.

पूर्वीच्या अहवालांमध्ये असे सुचवण्यात आले होते की, भारताने इतर प्रोजेक्टाइल आणि क्षेपणास्त्रे रोखण्याव्यतिरिक्त एक पाकिस्तानी एफ-१६ आणि कदाचित दोन जेएफ-१७ लढाऊ विमाने पाडली. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (AWACS) विमानही पाडल्याचे वृत्त आहे. तथापि, अधिकाऱ्याने कोणत्या प्रकारची विमाने पाडली हे स्पष्ट केले नाही.

पुढे बोलताना एअर मार्शल ए के भारती यांनी पाकिस्तानी विमाने पाडण्यात आली याची नेमकी संख्या विचारली असता, “आम्हाला येथे अंदाज लावायचा नाही”. “माझ्याकडे आकडे आहेत आणि आम्ही ते स्थापित करण्यासाठी तांत्रिक तपशीलांचा शोध घेत आहोत. म्हणून, मी सध्या एक आकडा सांगू इच्छितो”.

“वेगवान, समन्वित आणि कॅलिब्रेटेड प्रत्युत्तरात, आम्ही पश्चिम आघाडीवरील प्रमुख पाकिस्तानी लष्करी मालमत्तांवर हल्ला केला. यामध्ये हवाई तळ, कमांड सेंटर, लष्करी पायाभूत सुविधा आणि हवाई संरक्षण प्रणालींचा समावेश होता. आम्ही ज्या तळांना लक्ष्य केले त्यात चकलाला, रफीकी – आणि विशेषतः चकलाला इस्लामाबादमध्ये आहे, असे एअर मार्शल भारती पुढे म्हणाले.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी पाकिस्तानविरुद्ध त्रि-सेवा लष्करी कारवाई सुरू केली आणि इस्लामाबादवर सीमापार दहशतवादाला आश्रय देण्याचा आरोप केला. भारताच्या कारवाईनंतर, पाकिस्तानी सैन्याने भारतीय शहरे आणि लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी हे प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडले.

एअर मार्शल ए.के. भारती यांनी पुष्टी केली की, “…आम्ही दहशतवादी छावण्या नष्ट करण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य केले आहे का, आणि उत्तर एक जोरदार हो आहे आणि त्याचे परिणाम संपूर्ण जगाला दिसतील…असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.”

इस्लामाबादने संवाद सुरू केल्यानंतर आणि लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) पातळीवरील चर्चा झाल्यानंतर शनिवारी भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीवर सहमत झाले. आता भारत पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधीच्या अनुषंगाने उद्या सोमवारी दुपारनंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये बैठक होणार आहे.

About Editor

Check Also

पंतप्रधान मोदी यांची माहिती, अर्थसंकल्प हा तयारी आणि प्रेरणेतून तयार केलेला एका लेखी मुलाखती दरम्यान व्यक्त केली भावना

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा “आता किंवा कधीच नाही” हा जबरदस्तीतून निर्माण झालेला क्षण नव्हता तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *