संसदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या ऑपरेशन सिंदूरवरील मुद्यांवर आक्षेप घेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या बोलण्यात अडथळे आणण्यास सुरुवात केली. परंतु या सततच्या अडथळ्यांवरून केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संतप्त होत विरोधकांवर टीका केली. तसेच वारंवार व्यत्यय आल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांच्या जागेवरून उठून विरोधकांना फटकारले.
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार केलेल्या युद्धबंदीच्या दाव्यांवर डॉ एस जयशंकर बोलत होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही या डॉ एस जयशंकर यांच्या विधानाचा विरोधकांनी निषेध करण्यास सुरुवात केली. डॉ एस जयशंकर म्हणाले की, २२ एप्रिल ते १७ जून दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही फोन कॉल झाला नाही.
त्या मुद्याववरून विरोधकांनी डॉ एस जयशंकर यांच्या बोलण्यास अडथळे आणण्यास सुरुवात केली. त्यावेळी अमित शाह यांनी हस्तक्षेप करत म्हणाले की, विरोधी पक्ष त्यांच्या स्वतःच्या परराष्ट्रमंत्र्यांना काढून टाकण्यास तत्पर आहे, पण त्यांचा दुसऱ्या देशावर विश्वास आहे.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, …माझा आक्षेप आहे की त्यांना (विरोधी पक्षाला) भारतीय परराष्ट्रमंत्र्यांवर विश्वास नाही पण त्यांना दुसऱ्या देशावर विश्वास आहे. मी त्यांच्या पक्षात परराष्ट्रांचे महत्त्व समजू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या पक्षाच्या सर्व गोष्टी सभागृहात लादल्या पाहिजेत. म्हणूनच ते तिथे (विरोधी पक्षाच्या बाकावर) बसले आहेत आणि पुढील २० वर्षे तिथेच बसतील…”
परराष्ट्र मंत्री डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या वारंवार केलेल्या दाव्यांना स्पष्टपणे नकार दिला आणि अमेरिकेसोबत भारताच्या चर्चेवर प्रकाश टाकला. डॉ एस जयशंकर म्हणाले की, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून पाकिस्तानकडून मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला होता – ज्याला मोदींनी उत्तर दिले की भारत आणखी कडक प्रत्युत्तर देईल असे सांगितले होते.
डॉ एस जयशंकर यांनी नंतर सांगितले की, भारताने ९ आणि १० मे रोजी पाकिस्तानकडून वारंवार होणारे हल्ले यशस्वीरित्या हाणून पाडले आहेत.
पुढे डॉ एस जयशंकर म्हणाले की, अनेक देशांनी १० मे रोजी भारताशी संपर्क साधला आणि नवी दिल्लीला कळवले की पाकिस्तान युद्धबंदीसाठी तयार आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, भारताने सर्व देशांना हे स्पष्ट केले आहे की जर पाकिस्तानकडून युद्धबंदीची चर्चा डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) चॅनेलद्वारे झाली तरच ती विचारात घेतली जाईल.
डॉ एस जयशंकर यांच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षांकडून अडथळे आणणे सुरूच राहिले, त्यामुळे अमित शाह यांनी पुन्हा एकदा हस्तक्षेप केला.
अमित शाह पुढे म्हणाले की, “जेव्हा त्यांचे नेते बोलत होते, तेव्हा आम्ही धीराने ऐकले, उद्या, मी त्यांनी किती खोटे बोलले याची यादी करेन. आता, ते सत्य हाताळू शकत नाहीत. अशा वेळी जेव्हा इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे आणि परराष्ट्र मंत्री बोलत आहेत, तेव्हा अशा प्रकारचा व्यत्यय योग्य आहे का? सभापती महोदय, एकतर तुम्ही त्यांना आत्ताच समजावून सांगा – नाहीतर आम्ही नंतर आमच्या सदस्यांना नियंत्रित करू शकणार नाही असे सांगत विरोधकांना एकप्रकारे धमकावले.
Marathi e-Batmya