प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहिर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुरस्कार सन्मार्थींची यादी जाहिर

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाच्या मान्यतेने केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध कला, सामाजिक, कृषी, उद्योग व व्यापार क्षेत्रासह, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने गौरवित त्यांच्या कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली. पद्मश्री पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्यांना मान्यवरांचा पद्मश्री पुरस्कार देताना प्रामुख्याने विचार केल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्काराने अच्युत पालव -कला, मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ, कला क्षेत्रात अश्विनी भिडे देशपांडे. चित्रकार वासुदेव कामत, सामाजिक क्षेत्रात चैत्राम पवार, वाडःमय आणि शिक्षण क्षेत्रात ज्येष्ठ पक्षीमित्र अभ्यासक मारूती चित्तमपल्ली, वैद्यकीय क्षेत्रात विलास डांगरे यांना जाहिर झाला आहे. तर कला-गायन क्षेत्रातून जसपिंदर नरूला, कला क्षेत्रातून रणेंद्र मुजुमदार यांना तर उद्योग व व्यापार क्षेत्रात अरूंधती भट्टाचार्य यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहिर झाला आहे. याशिवाय ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री तथा लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनाही मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहिर कऱण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध चित्रपट दिग्दशक शेखर कपूर यांनाही यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहिर झाला आहे. चित्रपट गायक अरजित सिंग यांनाही यंदाचा पद्मशी पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. तर सुझुकी कंपनीचे संस्थापक ओसामी सुझुकी यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

या सर्व पद्मश्री पुरस्कार विजेत्यांना प्रजासत्ताक दिनानंतर एका खास कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारकडून जाहिर करण्यात आलेली पद्मश्री पुरस्कार जाहिर झालेल्यांची यादी खालील प्रमाणेः

About Editor

Check Also

केंद्र सरकारचे आवाहन, इंधन आणि एलपीजी अंशत पूर्ववत पीएनजी (PNG) हा एलपीजी (LPG) सिलिंडरपेक्षा अधिक स्थिर पर्याय

लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजी च्या संभाव्य तुटवड्याबद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सोमवारी या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *