Breaking News

विशेष बातमी

राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातच माहितीची चोरी? इन्फोटेक कंपनीच्या एकास अटकः पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Mantralay

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या महसूली कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील महसूल विभागात महसूली अधिकाऱ्यांच्या बदली-बढतीचा मोसम सुरु आहे. या मोसमातच मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील महसूल विभागातील माहीतीची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यातील संपूर्ण महसूली अर्थात जमिनी, महसूली उत्पन्न अर्थात कर संकलन, रेडीरेकनरमधून मिळणारे उत्पन्न आदींची माहिती मंत्रालयातील महसूल विभागात आहे. …

Read More »

नोकरी लावण्याच्या नावाखाली गृह राज्यमंत्र्यांचा पीएस, आय़ुक्त, मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून लाखोंचा भ्रष्टाचार लोकायुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल

मुंबईः विशेष प्रतिनिधी मंत्रालयात नोकरीला लावतो किंवा शासकिय नोकरीत रूजू करण्याच्या नावाखाली राज्यातील तरूणांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. मात्र महानगरपालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या एका कनिष्ठ अभियंत्याला नियमित सेवेत समाविष्ट करण्याचे खोटे आश्वासन देत गतिमान कारभार आणि पारदर्शक कारभाराचा ढोल बजाविणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील …

Read More »

घरच्यांसाठी अब्जोधीश तिरूपतीला दिली अर्थमंत्र्यांनी ८० कोटीची जमिन १ रूपय़ात ११ गृहनिर्माण सोसायट्यांना डावलत देवस्थानवर खास मर्जी

मुंबईः खास प्रतिनिधी एकाबाजूला राज्यावर कर्जाचा मोठ्या प्रमाणावर डोंगर वाढत असताना दुसऱ्याबाजूला केवळ आपल्या घरातील व्यक्तीला आंध्र प्रदेशातील तिरूपती देवस्थानवर ट्रस्टी म्हणून वर्णी लावता यावी म्हणून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी शासनाच्या महसूलावर पाणी सोडत स्वतःच्या कुटुंबियांच्या फायद्याकरीता ८० कोटी रूपयांची चक्क सरकारी जमिन कवडीमोल भावाने अर्थात १ रूपये दराने दिल्याची धक्कादायक बाब …

Read More »

वंचित बहुजन आघाडीने घेतले महापुरातील दुर्घटनाग्रस्त ‘ब्रह्मनाळ’ गाव ७०० कुटुंबाचे पुर्नवसन करणार अँड.प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी सांगलीत आलेल्या महापुरातून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावातील नागरीक बोटीने जात असताना झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. या ब्रम्हनाळ गावातील ७०० नागरीकांचे पुर्नवसन करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. मागील …

Read More »

पूरग्रस्तांसाठी देहव्यापारातील भगिनीही देणार दोन दिवसाची कमाई सांगली-कोल्हापूर-सातारा भागात मदत वाटप, श्रम कार्यास नगर मधून चमू रवाना

अहमदनगरः प्रतिनिधी राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली बरोबरच कर्नाटकातील बेळगावात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देहव्यापारातील भगिनींनीही पुढाकार घेतला आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या भगिनीकडून दोन दिवसांची कमाई मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती स्नेहालय परिवाराने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्तभागातील मदत कार्य चमूत …

Read More »

महापूरप्रकरणी कृष्णा खोरे महामंडळावर खटला दाखल करणार प्रशासनाच्या गलथान कारभाराची उच्च स्तरीय चौकशी करण्याची काँग्रेस सरचिटणीस दाते-पाटील यांची मागणी

औरंगाबादः जगदीश कस्तुरे कोल्हापूर, सांगली आणि कराड परिसरात आलेला महापूर हा कृष्णा खोरे विकास महामंडळाने आपत्ती व्यवस्थापनाचे नियम पाळले नाहीत. त्यामुळे या भागात महापूर आल्याने या गलथान कारभाराच्या विरोधात कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याची घोषणा औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र दाते -पाटील यांनी केली. राज्यातील …

Read More »

अलमट्टीतून ३८००००, कोयनेतून ६९०७५ तर राधानगरीतून ७३५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग पुराचा विळखा कमी होणार

मुंबई : प्रतिनिधी अलमट्टी धरणातून 3 लाख 80 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे खुले असून धरणाचे मुख्य 3 दरवाजे उचलले आहेत. त्यामधून 3100 क्युसेक विसर्ग असा एकूण 7356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे …

Read More »

मेनलॅन्ड ते अँनाकापा पोहणारा मुंबईचा प्रभात ठरला पहिला आशियाई जलतरणपटू आशियाखंडातील पहिला महाविद्यालयीन विद्यार्थी

मुंबई: प्रतिनिधी कॅलिफोर्नियातील सांताबारबारा येथील मेनलॅन्ड ते अँनाकापा हे प्रशांत महासागरातील २० किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरीत्या पोहून पार करणारा मुंबईकर प्रभात कोळी हा आशिया आणि भारतातील पहिला जलतरणपटू ठरला आहे. आतापर्यँत जगभरातील केवळ १४ जलतरणपटूनी अशी कामगिरी साधली आहे. चेंबूरच्या बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या प्रभातने …

Read More »

सरकार प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींचे कर्ज नव्याने घेणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ३१३ बांधकामाधीन पाटबंधारे प्रकल्पांपैकी ५२ प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी रूपयांची गरज आहे. हे कर्ज घेण्यासाठी आझ झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सद्यस्थितीत राज्यातील ३१३ बांधकामाधीन प्रकल्पांवर आहेत. या प्रकल्पांवर ८३ हजार ३०० कोटी रूपयांचा खर्च झालेला आहे. उर्वरित कामासाठी ९३ हजार ५७० कोटी रूपयांची गरज …

Read More »

आश्रमशाळा ते मिशिगन विद्यापीठ व्हाया राज्य शासन शासकीय योजनेमुळे उघडले परदेशी शिक्षणाचे द्वार

मुंबई: प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील आश्रमशाळेची विद्यार्थिनी योगिता मारोतराव वरखडे हिला अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळाला असून परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे तिचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाने शिष्यवृत्ती देऊन हातभार लावला आहे. योगिताप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सूरज आत्राम या आदिवासी विद्यार्थ्यास इंग्लंडमधील शेफील्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला असून …

Read More »