विशेष बातमी

बुलेट ट्रेनला मुख्यमंत्र्यांचा विरोध, पण CS ने दिल्ली दौऱ्यानंतर का घेतली तातडीची बैठक? नियोजित बैठक एक दिवस आधीच घेतल्याने चर्चेला उधाण

राज्य आणि केंद्र सरकारकडून मुंबई ते अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन बुलेट प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. परंतु या प्रकल्पास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोध दर्शविल्याने हा प्रकल्प होणार की नाही अशी शक्यता निर्माण झालेली असतानाच दुसऱ्याबाजूला राज्याचे मुख्य सचिव नित्य नेमाने या प्रकल्पाचा आढावा घेत आहेत. …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले अधिकाऱ्यांना, आपल्यावर सीबीआयची नजर मी सांगितले तरी ऐकू नका पण...

राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आणि १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु झाले असून आता नव्याने निविदा, निधी वाटप यासंदर्भात प्रशासकिय पातळीवर बैठकांचे सत्र सुरु झाले. मात्र या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात निर्देश देत म्हणाले की, सीबीआयची नजर आपल्यावर असून मी सांगितले तरी ऐकू नका असे …

Read More »

डेहराडूनमधील ७८ वर्षिय महिलेने आपली संपत्ती केली राहुल गांधीच्या नावे भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातील मोठी घटना

देशातील प्रत्येक राज्यात बिगर भाजपा सरकारच्या विरोधात रान उठवून आपणचं कसे चांगले आणि हिंदूत्वावादी विचाराचे आहोत यासाठी भाजपाकडून जीवाचे रान करत साम, दंड आणि भेद नीतीचा वापर करण्यात येत आहे. परंतु भाजपाशासित उत्तराखंडमधील ७८ वर्षिय वयोवृध्द महिलेने आपली संपूर्ण मालमत्ता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावे केल्याची आणि त्याचा स्विकारही …

Read More »

स्थापना दिनीच मुख्य सरन्यायाधीशांनी व्यक्त केली सीबीआयच्या विश्वासार्हतेबाबत चिंता सर्व केंद्रीय यंत्रणा एकाच संस्थेच्या नियंत्रणाखाली आणण्याची व्यक्त केली गरज

मागील काही वर्षापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात असताना केंद्रातील भाजपा सरकारकडून मात्र त्याबाबत अवाक्षर काढले जात नाही. ईडी, सीबीआय, आयकर विभाग अशा तपास यंत्रणांनी राज्यातील सत्ताधारी नेतेमंडळींच्या घरी टाकलेल्या छाप्यांनंतर या आरोपांना जास्तच धार चढली. यापार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनीच …

Read More »

महाविकास आघाडीचा मोठा निर्णयः गुढी पाढव्यापासून महाराष्ट्र निर्बंध आणि मास्कमुक्त कोणत्याही प्रकारचा दंड आणि त्याबाबत कायदाही आता स्थगित

मागील दोन वर्षापासून राज्यातील जनतेचे कोरोना संसर्गजन्य आजारापासून बचाव व्हावा या उद्देशाने राज्यात एपिडमिक अॅक्ट (Epidemic Act) आणि आपतकालीन कायदा (Disaster management act) लागू करण्यात आला होता. मात्र आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या दोन्ही कायद्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून मास्क मुक्तीबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. आता या …

Read More »

नेहरूंचे नाव असलेल्या ‘त्या’ वास्तूचे पंतप्रधान मोदीं करणार नामांतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसच्या विरोधातील रोष काही आता लपून राहिला नाही. मात्र आता संसदेच्या परिसरात असलेल्या तीन मुर्ती परिसरातील नेहरूंचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेहरू संग्रहालयाचे नामांतर करण्यात येणार असून या नामांतरीत इमारतीचे उद्घाटन १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती …

Read More »

३७० हटविल्यानंतर काश्मीरमध्ये घेतल्या इतक्या लोकांनी जमिनी, केंद्राची संसदेत माहिती अवघ्या ३४ लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली

मोठा गाजावाजा करत काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला. त्यास नुकतीच तीन वर्षेही पूर्ण झाली. हा निर्णय घेतल्यानंतर काश्मीरमध्ये देशातील इतर नागरीकही मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी करून रहायला जातील अशा अनेक वल्गना भाजपाकडून करण्यात येत होत्या. तसेच काश्मीरमधील लोकांची रोटी-बेटी व्यवहार होईल अशा हवेतल्या कल्पनाही मांडण्यात आल्या. …

Read More »

जगातील सर्वाधिक श्रीमंत एलोन मस्क म्हणतात, मी श्रीमंत नाही तर “ते” आहेत पुतीन आहेत सर्वाधिक श्रीमंत

आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि त्यास जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण झाल्यामुळे अल्पावधीत जगातील सर्वाधिक श्रीमंत अशी बिरूदावली नामाभिधान मिरविणारे टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मस्क हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण त्यांच्या मते ते जगातले सर्वात श्रीमंत नाहीत. एलोन मस्क स्वतःला …

Read More »

राऊतांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार, शिवसेनेशी चेष्टा किती महाग पडलीय… चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ तास काम करतात आणि फक्त २ तास झोपतात असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्या वाक्याचा धागा पकडत चमच्यांची जागा कधी अंधभक्तांनी घेतली कळली नाही. त्यामुळे चमच्यांचे हाल होणार असा असा टोला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचे …

Read More »

उदगीर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाला हे १० आमदार देणार १ कोटी ५५ लाख रूपये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा आमदारांचा समावेश

आगामी मराठी साहित्य समेंलन उदगीर येथे होत आहे. या साहित्य समेंलनासाठी निधीची आवश्यकता आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा मधील १० आमदारांनी १ कोटी ५५ लाख रूपये देण्याचा निर्णय घेत तसे विनंती पत्र संबधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे मराठी साहित्य संमेलन होवू …

Read More »