मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील दलित पीडीत मृत मुलीचे पार्थिव तिच्या कुटुंबियांच्या हाती न सोपविता पोलिसांनी त्यावर अंत्यसंस्कार केले. त्याचबरोबर तिच्या कुटुंबियांना दोन दिवस डांबून ठेवत पोलिसांच्या एसआयटी टिम व्यतीरिक्त कोणालाही भेटू किंवा फोनवरून संपर्क करू दिला नाही. या पिडीत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका …
Read More »बाबरी मस्जिद प्रकरणाची चौकशी करणारे न्या.लिबरहान म्हणतात, “बाबरीचा निकाल म्हणजे फार्स” आयोगाने जी माहिती गोळा केली त्याच्या विरूध्द निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बाबरी मस्जिद पाडण्याच्यी घटना घडल्यानंतर या घटनेची चौकशी करण्यसाठी तेव्हाचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंगराव यांनी न्या.लिबरहान आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे काम १७ वर्षे चालले. त्या १७ वर्षात आयोगाने १०० साक्षीदार तपासले आणि अनेकांवर दोषारोप निश्चित करण्यात आले. मात्र सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ज्या गोष्टी पाह्यल्या आणि त्यानुसार …
Read More »क्रीडा धोरण असूनही राज्यातील शेवटचा घटक अजूनही उपेक्षित शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या क्रीडा धोरणाची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत
ठाणे : विशाल मोरेकर राष्ट्रीय स्तरावर आखण्यात आलेल्या क्रीडा धोरणाप्रमाणे राज्यातही १९९४, २०१२ आणि आता २०२० क्रीडा धोरण आखण्यात आले. परंतु राज्याच्या क्रीडा विभागाने या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली नसल्याने शेवटच्या घटकांपर्यंत त्याचा फायदा होत नाही. राज्यात शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या क्रीडा धोरणांची आवश्यकता असून त्यापद्धतीने आखणी करणे शक्य …
Read More »महाविकास आघाडीविरोधात भाजपाची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणत असल्याची भाजपाचे विनय सहस्त्रबुध्दे यांच्यासह तीन खासदांराचे पत्र
मुंबई : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून डिसेंबर २०१९ पासून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि प्रसारमाध्यमांच्या फ्रिडम् ऑफ स्पीच या संकल्पनेवर गदा आणली जात आहे. तसेच राज्यात राज्य सरकार पुरस्कृत गुंडागर्दी सुरु असल्याचा मुद्दा उपस्थित करत मानवी हक्क आयोगाने यासंदर्भात लक्ष घालावे अशी मागणी भाजपा नेते तथा खासदार विनय सहस्त्रबुध्दे, …
Read More »पंतप्रधान मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून ट्विटरवर ट्रेंड १.१४ मिलियन ट्विटच्या माध्यमातून देशाच्या अर्थकारण, बेरोजगारी, सरकारी कंपन्यांच्या विक्रीवरून प्रश्नांची सरबती
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय नेत्यांच्या वाढदिवसाला वर्तमान पत्रे, टेलिव्हिजन यासह सोशल मिडियावर शुभेच्छांचा ट्रेंड आपल्याला नवा नाही. परंतु सलग दोनवेळा देशाच्या पंतप्रधान पदी विरोजमान झालेले नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असताना ट्विटरवर राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून ट्रेंड केला जात असून मोदीजी नोकऱ्या कुठे आहेत? जीडीपी रसातळाला गेलाय, असा सवाल नेटकऱ्यांकडून …
Read More »गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांनी निवडणूक काळात ३ वेळा माहिती प्रसिध्द करणे बंधनकारक उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या सुधारीत सूचना जारी
नवी दिल्ली- मुंबई : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत १० ऑक्टोबर २०१८ व ६ मार्च २०२० रोजी तपशीलवार सूचना निर्गमित केल्या आहेत.या अनुषंगाने आयोगाने ११ सप्टेंबर, २०२० रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. संबंधित उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी यासंदर्भातील सूचना आणखी स्पष्ट …
Read More »मदन शर्मा हे नौदलातील कि मालवाहतूक जहाजावर काम करणारे ? सोशल मिडियावरील माहितीने खळबळ
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक कार्टून व्हॉट्सअॅपवरून पाठविल्यामुळे शिवसैनिकांनी मारहाण प्रकरण केलेले मदन शर्मा हे संरक्षण विभागाच्या नेव्ही अर्थात नौदलातील अधिकारी नव्हे मर्चंट नेव्ही अर्थात मालवाहतूक जहाजावरील अधिकारी असल्याची माहिती सोशल मिडियातून फिरत आहे. तर दुसऱ्याबाजूला त्याचे मिळालेल्या ओळखपत्रावरून ते सैन्य दलात असल्याची माहिती पुढे येत …
Read More »कोरेगांव भीमा चौकशी आयोगाला तीन महिन्याची मुदतवाढ गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई: विशेष प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील कोरेगांव भीमा येथे झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोरेगांव भीमा चौकशी आयोगाला तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आहे. ज्या दिवशी आयोग आपले कामकाज सुरु करेल त्या दिवसापासून पुढे तीन महिने मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मराठी ई-बातम्या.कॉमशी बोलताना दिली. …
Read More »मंत्रालयात ई-फाईल, ई-लीव्ह, एमआयएस प्रणाली सुरू होणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे ई-ऑफिस सुरु करण्यासंदर्भात आदेश
मुंबई : प्रतिनिधी प्रशासकीय व्यवस्था गतिमान करतानाच जनतेलाही चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ई-ऑफिस प्रणाली आणखी सक्षम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. त्यानुसार मंत्रालयातील नस्ती व्यवस्थापन ई-फाईल, रजा व्यवस्थापन ई-लीव्ह, ज्ञान व्यवस्थापन केएमएस, माहिती व्यवस्थापन एमआयएस या प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मंत्रालयातील ई-ऑफिस प्रणालीबाबत सादरीकरण तसेच आढावा बैठक मुख्यमंत्री …
Read More »मुख्यमंत्र्याचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची निनावी धमकी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त केली चिंता
मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याच्या निनावी धमकीबद्धल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली तसेच या कृतीचा तीव्र निषेधही करण्यात आला. सदरहू प्रकरण खूप गंभीर असून केंद्र सरकारने देखील याची तातडीने दखल घ्यावी व यामागे जे कुणी असतील त्यांना शोधून कठोर शासन …
Read More »
Marathi e-Batmya