मागील वर्षी वादग्रस्त बाबरी मस्जिदच्या जागेवर राम मंदिराची उभारणी करण्यात आली. तसेच लोकसभा निवडणूकीच्या काळात रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करताना राष्ट्रीय स्वंयसेवर संघ अर्थात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आता भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले असल्याचे वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा संदर्भ देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे इंदिरा भवन या नव्या इमारतीत स्थलांतरण करण्यात आल्यानंतर उभारण्यात पक्ष कार्यालयाचे उद्धाटन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि सोनिया गांधी यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात जी निवडणूक झाली ती पूर्णपणे चुकीची झाली. निवडणूक आयोगाला सांगितले होते की, मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता ठेवा, पारदर्शक पद्धतीने निवडणूका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आम्ही जी माहिती मागितली होती ती माहिती अद्याप निवडणूक आयोगाने दिली नसल्याचे सांगितले.
मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना राहुल गांधी म्हणाले की, मोहन भागवत हे दर दोन-तीन दिवसांनी देशाला स्वातंत्र्यांच्याबाबत काय विचार आहेत ते सांगत असतात. त्यांनी नुकतंच केलेले वक्तव्य हे देश द्रोहाशी संबधित होतं. त्यांच्या म्हणण्याचा सरळ अर्थ हाच होता की, राज्यघटनेचं काही औचित्य नाही, इंग्रजांच्या विरोधात जी लढाई देशाने लढली त्याला काही अर्थ नाही, मोहन भागवत यांनी रामाची मुर्तीची ज्या दिवशी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. तो दिवस उत्सावाचा दिवस म्हणून साजरा करा, कारण त्या दिवसापासून देशाला खरं स्वातंत्र्य मिळाल्याचे सांगितल्याचेही यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले.
LIVE: Inauguration of the new AICC HQ | New Delhi https://t.co/l3l16riNF3
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 15, 2025
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जर मोहन भागवत यांनी असे वक्तव्य दुसऱ्या देशात असे सार्वनिकरित्या केले असते तर त्यांना सरळ अटक झाली असती. त्यांच्यावर खटलाही दाखल करण्यात आला असता. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही असं म्हणणे या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. मोहन भागवत यांनी हा अपमान केला. आता हि वेळ आली आहे की, मोहन भागवत वायफळ बडबड करत आहेत, ती वायफळ बडबळ ऐकणं बंद केलं पाहिजे, कारण आता लोकांना कळलं आहे की एकच वाक्य अनेक वेळा बोलत राहतील आणि तेच वक्तव्य खरं आहे म्हणून ओरडून सांगत राहतील असेही यावेळी सांगितले.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, हि दोन विचारधारांमधील द्वंद किंवा विचारधारामधील लढाई आहे. राज्यघटना ही आमची विधानधारा आहे.तर दुसरीकडे संघाचा विचार नेमका उलट आहे. देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आहे. पण मोहन भागवत त्याच गोष्टीला नाकारत आहेत. पण अशा विचारधारेला फक्त काँग्रेसच रोखू शकणारा पक्ष आहे असेही यावेळी सांगितले.
कांग्रेस पार्टी ने लोगों के साथ मिल कर, संविधान की बुनियाद पर, भारत की सफलता का निर्माण किया है। लोगों के अधिकारों के कवच, संविधान की रचना से लेकर रक्षा तक का दायित्व कांग्रेस ने निभाया है।
हमारा नया मुख्यालय हमारी इसी समृद्ध ऐतिहासिक विरासत और विज़न का प्रतीक है।
हमारी… pic.twitter.com/q2slBOTxd6
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 15, 2025
Marathi e-Batmya