काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक खास लेख लिहित निवडणूक आयोगाच्या मदतीने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केला. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगानेही राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांकडे जाण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाकडे संपर्क साधावा अशी सूचना केली. त्यानंतर एका इंग्रजी वृत्तसंस्थेने केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि महाराष्ट्रातील मतदार यादी शेअर केल्याचे वृत्त दिले. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी ती माहिती शेअर केल्याच्या नेमक्या तारखा सांगेल का असा सवाल त्यांच्या एक्सवरून केला.
वास्तविक पाहता राहुल गांधी यांच्या मॅचफिक्सिंगच्या मुद्यावरून लिहिलेल्या लेखात अनेक मुद्दे उपस्थित केले. तसेच निवडणूक आयोगाने भाजपासाठी निवडणूक मॅनेज करून दिल्याचा आरोपही यावेळी केला. त्याचबरोबर ४० लाख मतदारांच्या संख्येत वाढ, रात्री उशीरापर्यंत मतदान करून घेणे आदी मुद्यांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत
मतदानाच्या वेळच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली. त्यावरून निवडणूक आयोगानेही या मुद्यांवर भाष्य करत राहुल गांधी यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे सांगत आमच्याशी संपर्क केला तर आम्ही हवी असलेली माहिती देऊ असे जाहिर केले.
त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा हवाला देत एका इंग्रजी वर्तमान पत्राने यापूर्वीच हरियाणा आणि महाराष्ट्रातील मतदारांची यादी दिल्याचा दावा केला. त्यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा निवडणूक आयोगाला एक्सवरून सवाल करत त्या नेमक्या कोणत्या तारखा असा सवालही यावेळी केला.
Good first step taken by EC to hand over voter rolls.
Can the EC please announce the exact date by which this data will be handed over in a digital, machine-readable format? pic.twitter.com/SbW3DrCapK
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 9, 2025
Marathi e-Batmya