Breaking News

Tag Archives: भाजपा

ओरिसाचे मुख्यमंत्री म्हणून मोहन माझी यांनी घेतली शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथग्रहण सोहळा

मोहन माझी यांच्या नेतृत्वाखाली ओडिशातील पहिल्या भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा आज (१२ जून) भुवनेश्वर येथे पार पडला. भुवनेश्वर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात चार वेळा आमदार आणि आदिवासी नेते मोहन चरण माझी यांनी ओडिशाचे पहिले भाजपा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाचे ज्येष्ठ नेते …

Read More »

एनडीए नेत्यांच्या उपस्थित टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित

तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) राष्ट्रीय अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, वैद्यकीय आणि आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि बंदी संजय, भारताचे माजी सरन्यायाधीश …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, आकस कायम… निधी वाटपात महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय मोदी-शाहसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस अजित पवारांची हिम्मत नाही

महाराष्ट्रातून जीएसटीसह सर्व प्रकारच्या कर संकलनातून सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकडे जमा होतो पण राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यांना निधी वितरण करण्यात आले. यामध्ये भाजपाशासित उत्तर प्रदेशला सर्वात जास्त २५ हजार कोटी रुपये, मध्य प्रदेशला १० हजार …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, मोहन भागवतजी बोलले पण एक वर्ष उशीराने बोलले आता तरी पंतप्रधान अद्यापही जळत असलेल्या मणिपूरला जाणार की नाही

लोकसभा निवडणूकीपूर्वी मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार हा काही केल्या शांत व्हायला तयार नाही. तिकडे अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेलेले नाहीत. त्यावर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतजी बोलले तरी खरे पण एक वर्षाने बोलले. मग आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळत असलेल्या मणिपूरला जाणार की नाही असा सवाल शिवसेना उबाठा …

Read More »

शरद पवार यांचा टोला, हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भटकती आत्मा टीकेला प्रत्युत्तर

मोदींचा प्रचार हा मी काही सांगायची आवश्यकता नाही. पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करते? पंतप्रधान हा कुठल्या एखाद्या पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. अपेक्षा अशी असते की देशाच्या पंतप्रधान यांनी देशातील सर्व जाती, धर्म, भाषा या घटकांचा विचार केला पाहिजे, पण हे करायला मोदी विसरले. विसरले असं …

Read More »

शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीची प्रस्तावित कामे तातडीने करा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आदेश

शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीची प्रस्तावित कामे तातडीने करण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मुंबईत शासकीय निवासस्थानी या वसाहतीच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शिर्डीतील औद्योगिक वसाहतीच्या कामाचा विविध विभागाकडून सखोल आढावा घेतला. शेती महामंडळाच्या वतीने ५०० एकर जमीन औद्योगिक महामंडळाला …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जून्यासह या नव्या मंत्रांचा समावेश काही जणांना कॅबिनेट तर काही जणांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी

लोकसभेत एनडीए आघाडीला बहुमत मिळाले. त्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात जून्या मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त मंत्र्यांच्या समावेशासह काही नव्या वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्याचा समावेशही यावेळी करण्यात आला. त्यामध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तथा शेतकरी आंदोलनाच्या विरोधात …

Read More »

शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांची राज्यमंत्री पदावर बोळवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा कमी दर्जाचे मंत्रीपद

लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळी भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाही भाजपाच्या मदतीने हिसकावून घेतली. या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ७ खासदार निवडूण आणले. तसेच शिंदे गटाने केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री पदेही मागितली होती. मात्र भाजपाने एकनाथ शिंदे …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नरेंद्र मोदी यांना दिली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ इतर मंत्रिमंडळाचे सदस्यांनी ही घेतली मंत्री पदाची शपथ

लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा विजयी झालेल्या एनडीएची सर्वात मोठी सदस्य संख्या असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी जात सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शपथ दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान पद व गोपनीयतेची शपथ दिली. …

Read More »

माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा, पंकजा मुंडे यांचे आवाहन अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात..

तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची..माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा..आई बापाला दुःख देऊ नका, त्यांच्या जीवाला घोर लावू नका असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी तरूणांना केलं आहे. अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात..शांत व सकारात्मक रहा अशा शब्दांत संयम राखण्याचे आवाहन केले. नुकत्याच झालेल्या …

Read More »