सुप्रिया सुळे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेटः बैठक बोलवा आझाद मैदानावर दिवे बसवावे

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास्थळी अनेक राजकीय नेते पदाधिकारी सध्या भेटीसाठी येत आहेत. त्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुपारी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाज इथे जमलेला आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने सोडवायलाच हवा असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले, राज्यातील जनतेचे प्रश्न आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे की विरोधकांची असा प्रतिप्रश्न करत त्या पुढे म्हणाल्या. सत्ता त्यांच्या हाती असता विरोधक आरक्षणाचा प्रश्न कसा सो़डविणार असा सवाल करत राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने विधिमंडळाचे अधिवेशन बोलवावे किंवा राज्य सरकारने सर्व पक्षिय बैठक बोलावून या प्रश्नी तोडगा काढावा अशी मागणीही यावेळी केली.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर स्वच्छता राखण्याबाबत आणि जे काही टॉयलेट्स ठेवलेलेल आहेत त्याच्या आजूबाजूची आणि त्यातील घाणीची स्वच्छता करावी अशी मागणी मुंबई महापालिकेकडे केली आहे. तर ही स्वच्छता करण्यात यावी आणि आझाद मैदानावर रात्रीच्या वेळी अंधार पडत असल्याने दोन चार लाईट बसवाव्यात अशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून यावेळी केली.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन परत निघाल्यानंतर त्यांच्या गाडीच्या भोवती काही मराठा आंदोलकांनी कडे करून त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्य काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीला मार्ग करून देत घटनास्थळावरून बाहेर पडण्यास मदत केली. मात्र सुप्रिया सुळे यांना पाहण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या मराठा आंदोलकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाह्यला मिळाले.
मराठा आंदोलकांच्या गर्दीतून त्यांची गाडी बाहेर पडल्यानंतर एखाद दुसऱ्या मराठा आंदोलकांने सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर पाण्याच्या रिकाम्या बॉट्ल्स फेकण्याचा प्रयत्न केला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *