देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसंच एके काळी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होतं. गुजरातने उत्तम प्रशासकांची ओळख देशाला करून दिली. जी नावं मी तुम्हाला सांगितली त्यापैकी सर्वांचे एक वैशिष्ट्य …
Read More »शरद पवार यांचे अमित शाह यांना प्रत्तुत्तर, गांभीर्याने घेत नाही…त्यांची लेव्हल नाही १९७८ साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, ते कोठे होते माहित नाही
नुकत्याच झालेल्या शिर्डीतील भाजपाच्या महाअधिवेशनात बोलताना भाजपाचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, १९७८ पासूनचे शरद पवार यांचे विश्वासघाताचे राजकारण संपविले असून राज्यातील मतदारांनी त्यांचे राजकारण २० फुट खोल खड्ड्यात गाडले असल्याची खोचक टीकाही केली. अमित शाह यांच्या या टीकेला राष्ट्रवादी …
Read More »दिल्लीत भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार रमेश बिधुरीः केजरीवाल यांचा दावा रमेश बिधुरी यांनी मात्र केजरीवाल यांचा दावा फेटाळला
पुढील महिन्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाचे उमेदवार असल्याचा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा दावा भाजपा नेते रमेश बिधुरी यांनी रविवारी फेटाळून लावला. रमेश बिधुरी यांनी या अटकळीला “पूर्णपणे निराधार” म्हटले आणि पक्षाचे समर्पित कार्यकर्ते म्हणून लोकांची सेवा करण्यावर आपले लक्ष असल्याचे सांगितले. रविवारी जारी केलेल्या पत्रात, रमेश …
Read More »नितीन गडकरी यांचे प्रतिपादन, पक्षाची जबाबदारी रामराज्य, शिवशाही आणण्याची सामाजिक समता आणि समृद्ध महाराष्ट्र
आपला महाराष्ट्र समृद्ध आहे. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याची ताकद महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्राची अधिकाधिक प्रगती झाली तर देशाचे भविष्य उज्जवल होणार आहे. शिवशाही आणि रामराज्याच्या अपेक्षेने जनतेने अभूतपूर्व यशातून बहाल केलेल्या या सत्तेचा उपयोग करून महाराष्ट्र समृद्ध व्हावा, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, महाराष्ट्रात शिवशाही निर्माण व्हावी, ही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची, …
Read More »भाजपा महाअधिवेशनात मतदारांनी महायुतीला साथ दिल्याबद्दल मतदारांचे अभिनंदन शिर्डीतील एक दिवसीय महाअधिवेशनात केला ठराव मंजूर
विरोधी पक्षांनी केलेला अपप्रचार नाकारून सुशासन, विकासासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करणारा ठराव प्रदेश भाजपा च्या शिर्डी येथे रविवारी झालेल्या महाअधिवेशनात मंजूर करण्यात आला. मुंबई भाजपा अध्यक्ष व राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी याबाबतचा ठराव मांडला. माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी या …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन, राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा भाजपा राज्य अधिवेशनात केले आवाहन
जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आले आहे. आता महायुती सरकारची लोककल्याणाची, विकासाची कामे जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी चे प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केले. शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या महाअधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »सुरेश धस यांचा गौप्यस्फोट, गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा आकासोबत फोटो धाराशिवमधील जनआक्रोश मोर्चात फोटो दाखवत धनंजय मुंडे यांना केले लक्ष्य
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपाचे आमदार सुरेश धस, मनोज जरांगे पाटील, राणा जगजित सिंग पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह यांच्यासह अनेक राजकिय नेते तथा कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. या मोर्चासमोर बोलताना सुरेश धस यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, ‘मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करा कॅम्पसला भेट देवून कामांना गती देण्याचे निर्देश
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) याबाब विश्वासार्हता अधिक असून. येथील वैद्यकीय सेवा-सुविधा वाढाव्यात व अधिकाधिक गरजू रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे आराखड्यानुसार कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, सभ्य भाषणे देणारे राजकारणी काही काळासाठी प्रासंगिक… एका पोडकास्टला दिलेल्या मुलाखतीत केले वक्तव्य
सभ्य भाषणे देणारे काही व्यावसायिक राजकारणी हे काही काळासाठी प्रासंगिक राहु शकतात. परंतु दिर्घकाळासाठी टिकू शकत नाहीत असे भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सोशल मिडियावर चालविण्यात येणाऱ्या पोडकास्टला नुकतीच मुलाखत दिली. त्या मुलाखतीत उत्तर देताना ते बोलत होते. राजकारणात प्रवेश करण्यासंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध… माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत १०० दिवसांच्या कामांचे नियोजन सादर
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांची संकेतस्थळे अद्ययावत करण्यासाठी सर्व विभागांकडून तत्काळ अधिकृत माहिती उपलब्ध करुन घ्यावी. शासनाकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली माहिती साठविण्यासाठी क्लाऊड सेवेचा उपयोग करावा. तसेच नागरिकांना सर्व योजनांची आणि लाभांची घरपोच सेवा उपलब्ध होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागरिकांना सर्व …
Read More »
Marathi e-Batmya