Tag Archives: मुंबई

काँग्रेसच्या सात हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी टिळक भवनमध्ये प्रशिक्षण शिबीर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आलेली आहे. या अभियानातून काँग्रेसने ७ हजार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. या ७ हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे दिनांक २६ मे ते २९ मे दरम्यान विभागनिहाय प्रशिक्षण शिबिर …

Read More »

शंभूराज देसाई यांची माहिती, मुंबईतील ‘म्हाडा’च्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत सकारात्मक अधिवेशात लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नावर निर्देश देताना दिली माहिती

मुंबई शहरातील ‘म्हाडा’च्या ३८८ इमारतींच्या  पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक असून या कामाला गती देण्यासाठी नगरविकास विभागाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्न व लक्षवेधींतील मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासात येणाऱ्या अडचणी संदर्भात मेघूदत या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत प्रभारी गृहनिर्माण …

Read More »

मुंबईत पोक्सो अंतर्गत ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन सपोर्ट पर्सन अर्जासाठी १५ दिवसांची मुदत

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात पोक्सो अंतर्गत बाल पीडितांना न्यायप्रक्रियेदरम्यान सहाय्य व संरक्षण देण्यासाठी ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. इच्छुक उमेदवारांनी १५ दिवसांच्या …

Read More »

मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन

राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई अग्निशमन दल, एमआयडीसी व महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील १२ अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवेकरिता जाहीर झालेले राष्ट्रपती पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. गेल्या काही दशकांत अग्निशमन …

Read More »

एकनाथ शिंदे यांची घोषणा, मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ आता नव्याने झोपड्या निर्माण होऊ नये म्हणून “नेत्रम” ठेवणार लक्ष

मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. एकीकडे झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देत दुसरीकडे नेत्रम तंत्रज्ञानाच्या मदतीने नव्या झोपड्या उभारल्या जाऊ नये याची पण काळजी घेतली जाणार आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे महत्वाचे अभियान राबवून एकप्रकारे बाळासाहेबांना ही …

Read More »

माधुरी मिसाळ यांचे आश्वासन, अग्निसुरक्षा परवानगीची चौकशीत दोषी आढळल्यास विकासकावर कारवाई जोगेश्वरीतील प्रकरणी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन

मुंबईतील जोगेश्वरी येथील मे.ज्ञानप्रकाश शुक्ला डेव्हलपर्स एलएलपी या बांधकाम प्रकल्पाला देण्यात आलेल्या अग्निसुरक्षा परवानगीबाबत उपस्थित झालेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर तपासणीचे आदेश देण्यात आले असून, दोषी आढळल्यास संबंधित विकासकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. सदस्य प्रकाश सुर्वे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या …

Read More »

उदय सामंत यांचे आश्वासन, मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार विधान परिषदेत अर्धातास चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

मुंबईमध्ये वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य प्रविण दरेकर यांनी याबाबत सूचना उपस्थित केली होती. मंत्री उदय सामंत म्हणाले, उंच इमारतींमध्ये आधुनिक अग्निसुरक्षा प्रणाली अनिवार्य करण्यात आली असून …

Read More »

माधुरी मिसाळ यांची माहिती, १० हजार बसची आवश्यकता बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार

मुंबईतील बेस्ट बससेवाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व स्थानिक आमदार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. या बैठकीस परिवहन विभागाचे अधिकारी यांनाही बोलवण्यात येईल असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रवीण दरेकर, सचिन अहिर यांनी उपप्रश्न उपस्थित केला. राज्यमंत्री माधुरी …

Read More »

माधुरी मिसाळ यांचा इशारा, मुंबईत वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिला इशारा

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन गंभीर असून, बांधकाम प्रकल्पांसाठी निश्चित केलेल्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. मुंबईतील बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण मापन यंत्रे बसवणे, धूळ नियंत्रणाचे उपाय करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नात  दिली. मुंबईतील वायू …

Read More »

आयएएस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे पत्र वेळेत हजर रहा आणि विधिमंडळात बसत जा

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारी रोजी पासून सुरु झाले. मात्र त्यानंतरच्या पहिल्या दोन दिवसातच राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आयएएस अधिकारी एम के सिंग यांना अचानक एका विषयावर चर्चा करण्यासाठी आणि माहितीचे ब्रिफींग घेण्यासाठी विधिमंडळातील मंत्री कार्यालयात पाचारण करण्यात आले. सदर अधिकाऱ्यांस जवळपास चार ते पाच वेळा बोलवणे धाडूनही …

Read More »