एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नदीजोड प्रकल्पाला सीडब्ल्यूसीची मान्यता मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रकल्पाचे काम सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (एमडब्लूआरआरए) च्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. …
Read More »भिवंडी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत
भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत या इमारतीच्या दुर्घटनेत १९ जनांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी त्यांनी बचाव आणि मदतकार्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली तसेच प्रभावीपणे बचावकार्य राबविण्याच्या सूचना देत, प्रभावित …
Read More »गिरीष महाजन यांची माहिती, अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनांची चौकशी होणार नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे नुकसान अशा घटना घडत असून, अशा सर्व घटनांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत,नागरिकांनी सतर्क रहावे व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले. मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे ही …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार, विकासाच्या बाबतीत आता नाशिक थांबणार नाही कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूकशिखर परिषदेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असलेले नाशिक शहर यापुढील काळात विकासाचे ग्रोथ इंजिन ठरेल, विकासाच्या बाबतीत आता नाशिक थांबणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. क्षमता आणि सुविधांद्वारे येथील औद्योगिक विकासाला खऱ्या अर्थाने बळ मिळेल आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे नमूद केले. हॉटेल ताज …
Read More »गिरीष महाजन यांची माहिती, नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विहीर तातडीने बुजविणार मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार
दिंडोरी येथे नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विहीर तातडीने बुजविण्याचे निर्देश नगरपालिकेला दिले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. दिंडोरी येथे काल रात्री विहिरीत कार कोसळून ६ शालेय विद्यार्थासह …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरसाठी तीन संस्थामध्ये करार एनएमआरडीए, एनबीसीसी आणि हुडको यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
महाराष्ट्रातील भावी आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र (IBFC) म्हणून “नवीन नागपूर” या भव्य प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (NMRDA) आणि केंद्र सरकारच्या नवरत्न दर्जाच्या दोन सार्वजनिक कंपन्या – एनबीसीसी (इंडिया) लि. आणि हु डको (HUDCO) यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करा कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा
नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यांसाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सन २०२७ मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, २०२७ च्या कुंभमेळ्याची तयारी करा धार्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी ‘महाकुंभा’ची निर्मिती करा
नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे, यासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे. या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यातील मंदिरे, तीर्थक्षेत्रे, सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईल, असे मोठे संमेलन केंद्र (कन्व्हेन्शन सेंटर) उभारावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »क्षयरोग निर्मूलनासाठी रुग्णांच्या समुपदेशनासह जनजागृतीही महत्वाची मंत्री गिरीष महाजन यांची बैठकीनंतर माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या नि-क्षय अभियानाच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी क्षयरोग रुग्णांच्या समुपदेशनासह जनजगृतीही महत्वाची असल्याचे प्रतिपादन मंत्री गिरीष महाजन यांनी केले. नि – क्षय अभियानाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे देशभरातील सर्व मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी मंत्री गिरिष …
Read More »ओबीसी आंदोलन स्थगित पण छगन भुजबळ यांचा इशारा, … जमाना जानता है की हम… इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत धक्का लागणार नाही
ओबीसी आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही. आरक्षणाच्या लढ्यासाठी हे दोन वाघ आपल्याला यापुढेही आवश्यक आहे. ओबीसींच्या प्रश्नांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी आपल्या सोबत आहे. मात्र यापुढील काळात आरक्षणाच्या या लढाईत आपण सर्व एकत्र राहिलात तरच आरक्षण टिकणार आहे. त्यामुळे आपापसात न लढता एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे सांगत इतर मागासवर्गीयांच्या …
Read More »
Marathi e-Batmya