Tag Archives: भूषण गवई

वर्षा गायकवाड यांची टीका, सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा उघड प्रयत्न सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या निषेधार्ह मुंबई काँग्रेसची निषेध रॅली

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच एका वकीलाने हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न हा एखाद्या व्यक्तीवरचा किंवा पदावरचा हल्ला नाही, तर तो संविधानावरचा हल्ला आहे. देशात सरन्यायाधीशच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा संतप्त प्रश्न करून सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा उघड प्रकार आहे. या हल्लेखोरावर रासुका कायद्याखाली करवाई करा जेणेकरून …

Read More »

भर न्यायालयात वकीलाकडून सरन्यायाधीशांच्या अंगावर बूट काढून फेकण्याचा प्रयत्न सनातण धर्माचा अपमान सहन करणार नाही वकीलाचे वक्तव्य

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सीजेआय यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ वकिलांच्या खटल्यांची सुनावणी करत असताना हे नाट्य उलगडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वकिलाने व्यासपीठाजवळ जाऊन आपला बूट काढून न्यायाधीशांवर फेकण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने बार आणि बेंच …

Read More »

नेपाळच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, आमच्या संविधानाचा अभिमान राष्ट्रपतींना विधेयकासंदर्भात कालमर्यादा देता येते का प्रकरणी सुनावणीवेळी दिला संदर्भ

भारतीय संविधानाची ताकद अधोरेखित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नेपाळ हिंसाचाराचा संदर्भ दिला. भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने राष्ट्रपती संदर्भ प्रकरणाची सुनावणी सुरू असताना नेपाळमधील तणावपूर्ण परिस्थितीचा उल्लेख केला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, “आम्हाला आमच्या संविधानाचा अभिमान आहे, शेजारील …

Read More »

शिक्षक भारती संघटनेचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांना पत्र पत्र लिहून निर्णयाचा पुनर्विचार करण्याची शिक्षक भारती संघटनेची मागणी

१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्हापरिषद, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकामधील अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना पुढील दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे. तसेच ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा …

Read More »

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन, विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करावा समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने कार्य करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वत:चा विकास साधताना समाजातील मागास घटकांना पुढे घेवून जाण्याचे महान विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांनी दिले असून या विचारांचा अंगिकार करत विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यावेळी केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत व विकासासाठी दादासाहेब गायकवाड,दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे,सदानंद फुलझेले यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून …

Read More »

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मनोगत, राज्यघटनेमुळे कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळात गौरव

भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून भारतीय राज्यघटना अद्वितीय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या सक्षम राज्यघटनेमुळे देशातील कोणतीही व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहोचू शकते, ही राज्यघटनेची ताकद असल्याचे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. विधानमंडळाच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना भारताची राज्यघटना या विषयावर सरन्यायाधीश …

Read More »

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, “गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” शिक्षकांविषयी सरन्यायाधीश भूषण गवई यांची कृतज्ञता

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या या विद्यालयात पुन्हा पाऊल ठेवतांना सरन्यायाधीश श्री. गवई यांनी आपली जडणघडण करणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी राज्याचे कौशल्य विकास मंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे …

Read More »

सरन्यायाधीश भूषण गवई यांची स्पष्टोक्ती, डॉ आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे अनावरण

विविध विषयांचे अभ्यासक व तज्ञ असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधीज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही मोलाची आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. शासकीय विधी महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राध्यापक आणि प्राचार्य, कारकीर्दीला …

Read More »

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख…. तंत्रज्ञानाने विधी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवावा: मुख्यमंत्री

येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे. सर्वांचा सहभाग व समर्पणातून निर्माण झालेल्या या विद्यापीठाने आपल्या गुणवत्तेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी, असा आशावाद देशाचे सरन्यायाधीश आणि विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई …

Read More »

सरन्यायाधीश भूषण गवई यांची स्पष्टोक्ती, डॉ आंबेडकरांच्या स्मरणासाठी संविधान उद्देशिका पार्क महत्वाचे पाऊल संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण संविधानाच्या उद्देशिकेतील मुल्यांचा अंगीकार व्हावा- मुख्यमंत्री फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्य यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली असून उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे. उद्देशिकेतील मुल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा त्यामुळे देशातील ९० टक्के प्रश्न कायमचे सुटतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज …

Read More »