मंत्रालयात लावलेल्या संरक्षण जाळीवर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जमली गावातील कंत्राटी शिक्षक रणजित बाबासाहेब आव्हाड याने उडी मारून आंदोलन केले. हा तरुण धरणग्रस्त असून सरकार कडून त्याला अद्याप नोकरी दिली गेली नाही. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मात्र त्याला जाळीवरून बाहेर काढताना सुरक्षा रक्षकांची मात्र चांगलीच दमछाक झाल्याचे यावेळी …
Read More »राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा इशारा, कंत्राटी जीआर रद्द न झाल्यास राज्यभरात आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मुंबईत निदर्शने
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कंत्राटी नोकर भरतीला काँग्रेससोबतच राष्ट्रवादीनेही तीव्र विरोध केला आहे राज्य सरकार आता कंत्राटी पद्धतीवर अनेक विभागातील पदे भरणार आहे. या निर्णयाचा निषेध करीत या संदर्भातील शासन निर्णयाची युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख व प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वात प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करीत होळी करण्यात आली जीआर …
Read More »आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन अप्पर वर्धा बाधितांच्या मागण्यांबाबत १५ दिवसांत बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रसारमाध्यमांशी बोलताना आश्वासन
अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन व अनुषंगिक मागण्यांबाबत येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यासाठी या बाधित गावातील जमीन, पुनर्वसनाचे पर्याय यांबाबत सर्वंकष आढावा घेऊन माहिती तयार करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. प्रकल्प बाधितांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा बैठकीत …
Read More »सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे मंत्रालयात अनोखे आंदोलन (व्हिडिओ) ५-६ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर चढून हल्लाबोल आंदोलन केले. ऐनवेळी आंदोलनकर्त्यांनी मंत्रालयातच आंदोलन सुरु केल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पोलिसांनी सुरक्षा जाळीवर चढत ५ ते ६ आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान आंदोलकांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या टाकून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास, आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण
महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबध्द होऊया आणि प्रयत्नशील राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »‘माझी माती, माझा देश’ अभियानास सुरुवात मंत्रालयात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अधिकारी-कर्मचारी घेणार पंचप्रण शपथ
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, ०९ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने सकाळी १० वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …
Read More »कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्भूमीवर कोकणाच्या गतीमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १२ …
Read More »सुट्टीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही शनिवार असूनही कामाचा उरक
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी (दि.४) रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (५ ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशन काळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला. तसेच कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. उपमुख्यमंत्री …
Read More »पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक मंत्री गुलाबराव पाटील याची माहिती
शासनाच्या सन २०२२ च्या शुद्धिपत्रकामुळे प्रदीर्घ काळ प्रशासनाची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यास त्याच्या वयाच्या ५० वर्षानंतर सेवानिवृत्तीपूर्वी पदोन्नतीची संधी उपलब्ध होईल, हा हेतू साध्य झाला आहे. शासनाने सदर शुद्धिपत्रक हे व्यापक हीत लक्षात घेऊन काढलेले असून विभागीय परीक्षेतून सूट देण्याच्या शासनाच्या अनुषंगाने न्यायाधिकरणात दोन स्वतंत्र मागणीसाठी दोन मूळ अर्ज दाखल केले …
Read More »सुरक्षा कायद्याबाबत अधिकारी एकतर्फी निर्णय घेणार नाही महासंघाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
अधिकाऱ्यांचे सुरक्षा कवच असलेल्या कायद्यात बदल करावा, अशी मागणी पावसाळी अधिवेशनात करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघाने मागणीला विरोध करत, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी कायद्यात बदल करू नका असे साकडे घातले. दरम्यान, अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधींना अडथळा ठरणारा कोणताही एकतर्फी निर्णय घेणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »
Marathi e-Batmya