Tag Archives: महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोग म्हणते, राहुल गांधी यांनी माध्यमांऐवजी आयोगाऐवजी थेट संपर्क साधावा आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे

काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीबाबत एक खास लेख लिहित मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप केला. त्यानंतर या लेखाचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशपातळीवर उमटले. तर राहुल गांधी यांनी लेखाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तरे भाजपाच्या नेत्यांकडून देण्यास सुरुवात झाली. त्यावरूनही काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, महाराष्ट्रात विधान सभेची झालेली निवडणूक ही मॅच फिक्सिंग राज्यातील महाराष्ट्र विरोधी सरकार घालवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यांचे स्वागत

महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती, या निवडणुकीत नेमकी काय झालं याचं सत्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडले आहे. दम असेल तर यावर खुलासा करावा असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात निवडणुकीत झालेले मतदान, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती २०२४-२५ मध्ये देशाच्या ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात

महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर आघाडी घेतली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १,६४,८७५ कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण ४,२१,९२९ कोटी रुपयांपैकी तब्बल ४० टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गत …

Read More »

हवामान खात्याचा इशारा कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यात पाऊसाची हजेरी राहणार पुढील ६ ते ७ दिवस अती मुसळधार पाऊस

हवामान विभागाने पुढील ६-७ दिवसांत केरळ, कर्नाटक, किनारी महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, तर २७-३० मे दरम्यान केरळमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, २९ मे पासून वायव्य भारतावर एक नवीन पश्चिमी विक्षोभाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील २-३ दिवसांत …

Read More »

मुंबईसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळा रोडचा समावेश

अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, प्रत्येक जिल्ह्यात पोक्सो न्यायालये स्थापन करा १०० पेक्षा जास्त केसेसे प्रलंबित असलेल्या जिल्ह्यांमध्ये न्यायालये सुरु करा

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२ (पोक्सो कायदा) अंतर्गत खटल्यांची सुनावणी करण्यासाठी समर्पित अधिक न्यायालये स्थापन करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले [मुलांवर बलात्काराच्या घटनांमध्ये नोंदवलेल्या संख्येत चिंताजनक वाढ]. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला एम त्रिवेदी आणि प्रसन्न बी वराळे यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण …

Read More »

राज्यातील ९५% स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या आसपास होतील

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चार आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत राज्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळीच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या …

Read More »

पहलगामला गेलेल्या पर्यटकांसाठी पवारांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांकडून विमान तर शिंदे हे स्वतः जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचा पुढाकार

पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली …

Read More »

संजय राऊत म्हणाले की, इकडे ही ठाकरे तिकडेही ठाकरे आम्ही सध्या… राज ठाकरे यांच्या आवाहनावर उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद शिवसेना उबाठाची मांडली भूमिका

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख आणि चुलत बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी कोणतेही वाद, भांडणं किरकोळ आहेत, तसेच एकत्र येणं आणि एकत्र राहणं फार काही कठिण नाही. फक्त प्रश्न आहे तो इच्छेचा असे वक्तव्य करत ठाकरे बंधू एकत्र येण्याचे राजकिय संकेत दिले. …

Read More »

चंद्रकात पाटील म्हणाले, त्यांना सत्तेत यायचं… संजय राऊत यांचे प्रत्युत्तर अमित शाह… चंद्रकांत पाटील यांच्या चिमट्यावर संजय राऊत यांचा खोचक टोला

लोकसभा निवडणूकीत भाजपाचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणूकीत मात्र भाजपाप्रणित महायुतीला भरघोस जागा मिळाल्या. त्यानंतर त्यानंतर मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. त्यानंतर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची किमान तीन ते चार वेळा विधान भवनात भेट झाली. त्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचीही मुख्यमंत्री …

Read More »