बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, येत्या २४ ते ४८ तासात पूर्ववत करणार असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. यावेळी परिवहनचे प्रधान सचिव पराग जैन, बीईएसटीचे आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते. बेस्टच्या ताफ्यात एकूण ३०५२ बसेस आहेत. …
Read More »पंतप्रधानांच्या हस्ते देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्याचा शुभारंभ संपन्न रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे ग्रामीण व शहरी भारत समृद्धी निर्माण होईल : राज्यपाल रमेश बैस
अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये राज्यातील ४४ व मुंबईतील परळ, विक्रोळी व कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या अनुषंगाने मध्य रेल्वे तर्फे रेल्वे कॉलनी मैदान परळ येथे आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री मंगलप्रभात …
Read More »सुट्टीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही शनिवार असूनही कामाचा उरक
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी (दि.४) रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (५ ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशन काळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला. तसेच कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. उपमुख्यमंत्री …
Read More »मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ अखेर मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या खुर्चीवरील स्टीकर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी काढले
मुंबईतील नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मंचावर एक खुर्ची राखीव ठेवण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री आले नसल्याने त्या खुर्चीवर लावण्यात आलेले स्टीकर विधानसभा अध्यक्ष राहुल …
Read More »मुंबई उपनगरातील रस्ते दोन वर्षाच्या आत काँक्रीटकरण करणार पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा. सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतुकींच्या कोंडींचा सामना करावा लागत आहे, यासाठी तातडीने खड्डे भरण्यात यावेत. नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी मुंबई उपनगरातील सर्व रस्ते दोन वर्षाच्या आत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रीटकरण करण्याच्या …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, ठाणे – नाशिक महामार्ग आठ पदरी…. मुख्यमंत्र्यांनी केली खारेगाव ते पडघा मार्गाची पाहणी
ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. लहान वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी अवजड वाहने डाव्या बाजूने चालविण्यासंदर्भात सूचना, तसेच या मार्गावरील खड्डे तातडीने मास्टिकने भरण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे- नाशिक महामार्गावरील …
Read More »येत्या तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन सुरू करणार पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
मालाड सामान्य रुग्णालय येथे मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर व मॉड्युलर प्रसूतीगृहामुळे रुग्णांना निर्जतुक वातावरण उच्च प्रतीची आरोग्य सेवा मिळणार असून, माता मृत्यू तसेच नवजात शिशु मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. तसेच आगामी तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन देखील बसवण्यात येणार आहेत अशी माहिती कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, दिल्लीतील ‘आका’साठी अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी दिली का ? जनतेच्या प्रश्नावर राज्य सरकार आंधळे व बहिरे, विरोधी पक्ष सरकारला जागे करेल
सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आली आहे. सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागे सरकारचा काय हेतू आहे हे कळले नाही. असा कोणता भूंकप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, म्हणून दोन दिवस कामकाज बंद ठेवले आहे याचे ठोस उत्तर मिळत नाही. दिल्लीतून त्यांचे ‘आका’ पुण्यात एका कार्यक्रमासाठी येत आहेत …
Read More »बाळासाहेब थोरात यांची मागणी, गिरणी कामगारांच्या घराचे प्रश्न सोडवण्याची कालमर्यादा निश्चित करा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची सभागृहात मागणी
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामाच्या निमित्ताने मुंबईत आलेले गिरणी कामगार हे मुंबईचे खरे निर्माते आहे, त्यांच्या हक्काच्या घराचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने कालमर्यादा निश्चित करावी आणि सकारात्मक रित्या हा प्रश्न सोडवावा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केले. बाळासाहेब थोरात म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात हा प्रश्न …
Read More »अहमदनगर जिल्ह्यातील एमआयडीसीबाबत तीन महिन्यांत निर्णय घेणार उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित ‘एमआयडीसी’ सुरू करण्यासाठी पाण्याची उपलब्धता, सलग क्षेत्र, वन्यजीव संरक्षण क्षेत्र, इको सेन्सेटिव्ह झोन आदी तांत्रिक बाबी तपासून येत्या तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य राम शिंदे यांनी एमआयडीसी मंजुरीबाबत सद्य:स्थिती काय आहे या अनुषंगाने नियम ९७ …
Read More »
Marathi e-Batmya