सुट्टीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही शनिवार असूनही कामाचा उरक

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी (दि.४) रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (५ ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशन काळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला. तसेच कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे तत्पर निर्णयांसाठी, त्यांच्याकडील नस्त्यांचा तसेच कामांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी ओळखले जातात. विधिमंडळ अधिवेशनकाळात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना भेटण्यासाठी, निवेदने व पत्रे देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. परंतु विधिमंडळ कामकाजातील व्यस्ततेमुळे सर्वच पत्रे-निवेदनांवर कार्यवाही होऊ शकली नव्हती, अधिवेशन संपताच, दुसऱ्या दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात येऊन सर्व प्रलंबित कामे निकाली काढली. या निमित्ताने अजित पवार यांच्या लोकाभिमुख कारभाराचा तसेच प्रशासकीय तत्परतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

About Editor

Check Also

गुलाबराव पाटील यांचे आदेश, न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीने समन्वयातून तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून, कोन ते पळस्पे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *