केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याने बिहारमध्ये सर्वच राजकिय पक्ष सज्ज झाले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यात ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होईल. १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. यावेळी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश, ओळखपत्र म्हणून आधारच तसे आदेश जारी करण्याचे बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदेश
बिहारमध्ये विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) अंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या सुधारित मतदार यादीत मतदाराचा समावेश करण्यासाठी आधार ओळखपत्र म्हणून स्वीकारला जाईल, अशी औपचारिक सूचना जारी करण्याचे निर्देश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) दिले. मतदार यादीतून वगळण्याच्या प्रस्तावित ६५ लाख नावांच्या संदर्भात यापूर्वी असेच निर्देश देण्यात आले होते. आता हे …
Read More »मत चोरीच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सासाराम येथून मतदार अधिकार यात्रेला सुरुवात, १६ दिवस चालणार यात्रा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी (१७ ऑगस्ट २०२५) बिहारमधील सासाराम येथून १६ दिवसांच्या ‘मतदार अधिकार यात्रे’ला सुरुवात केली. ही यात्रा १,३०० किलोमीटर अंतर कापेल आणि १ सप्टेंबर रोजी पटना येथे एका मोठ्या रॅलीने संपेल, जिथे विविध भारतीय पक्षांचे नेते सहभागी होतील. एक्स वरील पोस्टमध्ये …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचे राहुल गांधी यांना आवाहन, महाराष्ट्रातील ७६ लाख मतवाढ याचिकेतही सहभागी व्हा महाराष्ट्रातील मते वाढल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत इंटरव्हिनर म्हणून सहभागी होण्याचे आवाहन
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संध्याकाळी ५ नंhdjतर झालेल्या ७६ लाख मतवाढीच्या प्रकरणात सर्व विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात ‘इंटरव्हिनर’ म्हणून उतरावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सहभागी होवून मत मांडावे असे आवाहन केले. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले …
Read More »महसूल अधिकाऱ्यामुळे डोनाल्ड ट्रम्प ऊर्फ डॉग बाबू बिहारचे मतदार होता होता राहिले मतदार यादीच्या स्पेशन ड्राईव्हमध्ये डोनाल्ड
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात, सरकारच्या आरटीपीएस RTPS (राइट टू पब्लिक सर्व्हिसेस) पोर्टलद्वारे “डोनाल्ड जॉन ट्रम्प” या नावाने निवासी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. २९ जुलै रोजीच्या अर्जात अर्जदाराच्या वडिलांचे नाव “फ्रेडरिक क्राइस्ट ट्रम्प” असे नमूद केले आहे, ज्यात हसनपूर, वॉर्ड १३, बाकरपूर पोस्ट, मोहिउद्दीन नगर ब्लॉक, समस्तीपूर असा निवासाचा पत्ता आहे. …
Read More »तेजस्वी यादव यांचा आरोप, सुधारीत मतदार यादीतून माझे नाव गायब निवडणूक आयोग म्हणते, तेजस्वी यादव यांचा दावा खोटा
बिहारमधील राजद नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शनिवारी असा आरोप केला की, विधानसभा निवडणूकीसाठी बिहारमध्ये प्रकाशित झालेल्या सुधारित मतदार यादीतून त्यांचे नाव गायब आहे. राजद नेते तेजस्वी यादव म्हणाले की, “माझे नाव मतदार यादीतही नाही. मी निवडणूक कशी लढवू?”, असा सवालही यावेळी केला. तेजस्वी यादव यांच्या दाव्यानंतर लगेचच, …
Read More »विधानसभा निवडणुकः वाढलेल्या ७६ लाख मतांच्या याचिकेवर २५ जूनला निकाल प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या याचिके संदर्भात याचिकेवर अंतिम निकाल
राज्यातील विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत आक्षेप नोंदवित वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी त्यावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २५ जून रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे स्पष्ट …
Read More »विधानसभेतील ‘मतचोरी’ विरोधात उद्या गुरुवार १२ जून रोजी काँग्रेसचे राज्यभर मशाल मोर्चे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीतील आंदोलनात सहभागी होणार
विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी केली जात नाही. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली असून लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे. म्हणून प्रदेश काँग्रेस उद्या गुरुवार दिनांक १२ जून रोजी राज्यभर मशाल मोर्चे काढून …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोग म्हणते, राहुल गांधी यांनी माध्यमांऐवजी आयोगाऐवजी थेट संपर्क साधावा आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे
काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीबाबत एक खास लेख लिहित मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप केला. त्यानंतर या लेखाचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशपातळीवर उमटले. तर राहुल गांधी यांनी लेखाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तरे भाजपाच्या नेत्यांकडून देण्यास सुरुवात झाली. त्यावरूनही काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, महाराष्ट्रात विधान सभेची झालेली निवडणूक ही मॅच फिक्सिंग राज्यातील महाराष्ट्र विरोधी सरकार घालवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यांचे स्वागत
महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती, या निवडणुकीत नेमकी काय झालं याचं सत्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडले आहे. दम असेल तर यावर खुलासा करावा असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात निवडणुकीत झालेले मतदान, …
Read More »
Marathi e-Batmya