Tag Archives: शासन निर्णय

मराठवाड्यात कुणबी-मराठा किंवा मराठा- कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहिर

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या लढ्याला आज अखेर यश मिळाले. निझाम राजवटीच्या अखत्यारित असलेल्या मराठवाडयातील मराठा समाजाला कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी असे जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाच्या मागणीनुसार अखेर राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला. राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार निझाम …

Read More »

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, सरकारचा तो शासन निर्णय़ रद्द न्यायालयाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत, मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (१७ मार्च) शेतकऱ्यांना ‘उशीराने आणि कमी’ रास्त आणि किफायतशीर किंमत (FRP) देण्याची तरतूद करणारा शासन निर्णय़ (GR) रद्द केला आणि रद्दबातल ठरवला कारण त्याचा शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने …

Read More »

माहिती लोकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार एआय तंत्राचाही वापर, नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाच्या …

Read More »

रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदाचा कार्यभार स्विकारण्याचे राज्य सरकारचे आदेश राज्याच्या गृहविभागाचे आदेश

ाज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढीवर (एक्सटेन्शनवर) असलेल्या निवृत्त पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवित त्यांच्या जागेवर संजय वर्मा यांना निवडणूकीच्या कालावधी पुरती पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर आचारसंहितेचा कालावधी संपुष्टात आणला गेला. मात्र त्यानंतर संजय वर्मा यांच्याकडे असलेला पोलिस महासंचालक …

Read More »

राज्यातील भटक्या जमातीमध्ये नव्या जातींचा समावेश शासन निर्णय जारी

राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती/ भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातीच्या यादीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार शासनाने काही नवीन जातींचा अंतर्भाव करून तसेच काही जातींची नावे वगळून अद्ययावत यादी तयार केली आहे. नव्या बदलानुसार यापुढे ” ठेलारी” ही जात ‘भटक्या जमाती (ब)’ यादीतील अ.क्र. २७ येथून वगळून ‘भटक्या …

Read More »

राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक बनले मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक हे ३१ डिसेंबर २०२३ रोजी हे सेवा निवृत्त झाले. त्यांच्याकडे असलेला मुख्य सचिव पदाचा कार्यभार त्याच दिवशी ज्येष्ठ सनदी अधिकारी नितीन करीर यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. राज्य सरकारच्या प्रथेप्रमाणे निवृत्त झालेल्या मुख्य सचिव दर्जाच्या पदावरून नियुक्त झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांना पुन्हा …

Read More »

कुणबी प्रमाणपत्र समितीला दिली पुढील महिन्यापर्यंत मुदतवाढ समितीला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

तेलंगणा राज्यात निवडणुकांची आचारसंहिता असल्याने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने २४ डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे. निजामकालीन नोंदी मिळण्यासाठी समिती तेलंगणाच्या संपर्कात आहे मात्र देशातील काही राज्यात निवडणूक लागलेल्या आहेत यात तेलंगणा राज्याचाही समावेश असल्याने निजामकालीन नोंदी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाचे गौडबंगाल कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय गायब होतोच कसा

कोविड काळातील दैनंदिन वापराच्या वस्तुंच्या प्रलंबित देयकाचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने संकेतस्थळावरून अचानक गायब केला. कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय अचानक गायब केल्याने संशय बळावला आहे. विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता, शासन निर्णय गायब होतोच कसा? या शासन निर्णयाचे गौडबंगाल काय? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय …

Read More »

आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढविली विभागाकडून मुदतवाढीची घोषणा

आरोग्य विभाग भरती

आरोग्य विभाग अंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी २९ ऑगस्ट २०२३ पासून नोंदणी सुरू असून त्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२३ होती. परंतु दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन …

Read More »

कंत्राटी नोकर भरतीच्या शासन निर्णयाची होळी करा एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांना विजय वडेट्टीवारांचे आवाहन

राज्यातील मनुवादी विचारसरणीच्या सरकारनं विविध विभागात कंत्राटी कर्मचारी भरण्याच्या नावाखाली बेरोजगारांना नोकरीचे गाजर दाखवून कंपन्यांना मलिदा खाऊ घालण्याचं काम केलं असून कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय घेऊन मनुवादी सरकार पाच वर्षात खाजगी कंपनीच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीतून ३० हज़ार कोटींची लूट करणार असल्याचा आरोप करीत एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांनी कंत्राट नोकर भरती …

Read More »