गुजरात राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हडपसर परिसरात विकासकामांची पाहणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वाहतूक कोंडी सोडवा
शहरात दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ती सोडवा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवार यांनी खराडी ते केशवनगर पुलाच्या कामांसह मुंढवा चौक आणि हडपसर …
Read More »अजित पवार यांनी घेतला ‘सारथी’सह अ. पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामाचा आढावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना देण्याचे निर्देश
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, यावर भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण …
Read More »अजित पवार यांची माहिती, नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणणार नेपाळमधील राजकिय अस्थिर परिस्थितीवर केले भाष्य
नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्यसरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला …
Read More »‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते वितरित राज्यातील ९१ लाख ६५ हजार१५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८९२.६१ कोटी रुपये जमा
“शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आला. राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८९२.६१ कोटी रुपये निधी मंजुर निधी शेतक-यांच्या खात्यात वर्ग होईल. मंत्रिमंडळ सभागृह, ७ वा मजला, मंत्रालय मुंबई …
Read More »अजित पवार धमकी प्रकरण, रोहित पवार, अमोल मिटकरी धावले मदतीला काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची मात्र टीका
काही वर्षांपूर्वी राज्यातील पाण्याच्या प्रश्नावरून केलेल्या वक्तव्यावरून काही महिन्यांचा राजकीय विजनवासात काढावे लागल्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी सोलापूरमधील कुर्डुवाडीतील कार्यकर्त्याला वाचविण्यासाठी थेट महिला पोलिस अधिकाऱ्यालाच धमकी दिल्याचे प्रकरण चांगलेच अंगलट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर अजित पवार यांचे धमकावण्याचे प्रकरण योग्य असल्याचे दाखवून देण्यासाठी त्यांच्या पक्षाचे …
Read More »अतुल लोंढे यांची टीका, उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला अजित पवार यांची धमकी धमकी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा या महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दिलेली धमकी अत्यंत निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी देऊन अवैध धंद्याविरोधातील कारवाई थांबवा म्हणून दमदाटी करणे हे चुकीचे असून अजित पवारांची ही टगेगिरी महाराष्ट्राला तसेच अजित पवारांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शोभणारी नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते …
Read More »अजित पवार यांची माहिती, शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना
महाराष्ट्र शासनाने चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाखाली तब्बल २२ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातील मोठा हिस्सा जिल्हा परिषदेमार्फत थेट गावपातळीपर्यंत पोहोचतो. ग्रामपंचायतींनी हा निधी पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने वापरून गावांचा सर्वांगीण विकास साधावा. भारताचा आत्मा खेड्यांत आहे. खेडी समृद्ध झाली तर देश समृद्ध होईल, असे …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे १३ निर्णय संजय गांधी निराधार ,श्रावणबाळ, दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढसह १३ निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या आज बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेतल्यानंतर अनेक निर्णय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खुष करणारे निर्णय घेतल्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयातून दिसून आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची …
Read More »अजित पवार यांची माहिती, पुणे-लोणावळा’ रेल्वेच्या दोन मार्गिका आणि मेट्रोची दोन स्थानके वाढणार प्रकल्पासाठी राज्यशासनाच्या आर्थिक सहभाग देण्यास मंत्रीमंडळाची मान्यता
पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्यमंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागला आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya