Tag Archives: beed

मनोज जरांगे पाटील यांची मागणी, हेक्टरी ७० हजार आणि शेतीला नोकरीचा दर्जा द्या बीडच्या नारायण गडावरून पहिल्याच दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांची मागणीही आणि इशारा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्यानंतर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील नारायण गडावर पहिलाच दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. तसेच या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यासाठी लढाही पुकारला आहे. मनोज जरांगे …

Read More »

अजित पवार यांचे आदेश, या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन दर्जा, सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखा बीडच्या कंकालेश्वर मंदिरासह औंधचे संग्रहालय, राज्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा

बीड येथील कंकालेश्वर मंदिर व सातारा जिल्ह्यातील औंध येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून, ते करताना कामे दर्जेदार आणि हेरिटेज पद्धतीने व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये तसेच या स्मारकांच्या परिसरातील एकही …

Read More »

बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी बीड तालुक्यातील मौजे पिंपळगाव घाट, मौजे हिंगणी खुर्द, मौजे आहेर चिंचोली, खामगाव, नांदूर हवेली गावांची केली पाहणी

बीड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नद्यांना आलेल्या पुरामुळे नदी काठावरील अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावात नदीचे पाणी घरात व शेतशिवारात घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी …

Read More »

अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून या जिल्ह्यांसाठी हेल्पलाईन जारी जिल्हा प्रशासनास तातडीने मदत; साधनसामग्री उपलब्ध

राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून लक्ष ठेवण्यात येत असून यासाठी जिल्हा प्रशासनास आवश्यक मदत व साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात  असल्याने नागरिकांनी …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, सातत्याने क्राइम वाढतोय, लोकांना वर्दीची भिती नाही पुणे आणि बीडमधील परिस्थिती सारखीच

महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे सातत्याने क्राइम वाढतोय. त्यात पुणे जिल्हा आहे. जी पुण्यात परिस्थिती आहे, तशीच बीडमध्ये आहे. लोकांना न्याय मिळत नाहीय. वर्दीची भिती राहिलेली नाही. कोण आहे त्यांच्यामागे? सातत्याने हे लोक अशा गोष्टी करतायत. याचा शोध घेण्याऐवजी राज्य सरकार मौन बाळगते असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, बीडमधील लैंगिक शोषणाची एसआयटी चौकशी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची तात्काळ कारवाई

बीड येथील कोचिंग क्लास अर्थात शिकवणी वर्गात झालेल्या मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्यात येईल,  अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे का, यात कोणाचा वरदहस्त आहे का हे देखील तपासले जाईल. मुलींना न्याय मिळावा यादृष्टीने योग्य प्रयत्न करू. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, महायुतीने १०० दिवसात आका, खोके शब्द दिले काँग्रेसची उद्या रविवारी ४ मे रोजी परभणीत सद्भावना यात्रा व सोमवारी ५ मे रोजी संविधान बचाव यात्रा

महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे पातक झाले आहे पण आता हे चित्र बदलले …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य घाटशीळ पारगाव येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्ताहासाठी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे ९३ व्या वर्षापासून सुरू आहे. या परंपरेच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. गहिनीनाथ गडाचा विकास करताना बीड जिल्ह्याला पाणीदार जिल्हा करणार …

Read More »

अजित पवार यांच्या घोषणेनंतर बीड जिल्ह्यात १९१ कोटींची ‘सीआयआयआयटी’ ‘टाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनविण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात (सीआयआयआयटी) स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांच्या आतच ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने बीड जिल्ह्यासाठी १९१ कोटी रुपये खर्चून …

Read More »

आमदार सुरेश धस यांची माहिती, तुरुंगात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण तुरुंगाधिकारी म्हणाले अशी कोणतीची भांडणे झाली नाहीत

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर सध्या केजच्या न्यायालयात खटला सुरु आहे. मात्र या दोघांना ठेवण्यात आलेल्या तुरुंगातच असलेल्या दुसऱ्या टोळीच्या लोकांना वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना मारहाण केल्याची माहिती भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली. विशेष म्हणजे वाल्मिक कराड आणि …

Read More »