Tag Archives: chief minister

देवेंद्र फडणवीसांच्या सारथ्याखाली मुख्यमंत्री शिंदेनी केली समृध्दीची पाहणी

हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी १२.४५ वाजता दोन्ही नेत्यांनी नागपूर ते शिर्डी या प्रवासाला सुरुवात केली. विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाहणी दौऱ्याचे प्रचंड स्वागत झाले. विशेष म्हणजे या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

संजय राऊत यांचा शेलारांना सवाल, कधी करणार आरे ला कारे?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करत कधी जतमधील २८ गावांवर सांगितला तर कधी सोलापूर आणि अक्कलकोटवर दावा सांगत सोलापूरात कर्नाटक भवनची उभारणी करणार असल्याची घोषणा केली. यापार्श्वभूमीवर भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आरे ला कारे ने प्रत्युत्तर देऊ असा इशारा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिला. त्यातच आज नागपूरहून समृध्दी महामार्गाच्या …

Read More »

अखेर मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते दिव्यांग विभागाचे लोकार्पण

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यासाठी २०६३ पदांची निर्मिती करण्यात आली असून ११४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली माहिती देतानाच अशा प्रकारे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी …

Read More »

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाण्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकाराण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी “माझे ठाणे” ही भावना मनात ठेवून ठाण्याच्या विकासासाठी उत्कृष्ट दर्जाचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ठाणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा खोचक टोला, सीमाप्रश्नी मुख्यमंत्री शांत का?

दिवसेंदिवस कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करत असून आधी सीमावर्ती भागातील गावांवर दावा सांगितला. त्यानंतर सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी येवू नये यासाठी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिले. तर दुसऱ्याबाजूला सोलापूरात कर्नाटक भवनची आवश्यकता नसताना सोलापूरात कर्नाटक भवन उभारणार असल्याची घोषणा करत सीमाप्रश्नी वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरु आहे. …

Read More »

एका लुटारुला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर आधी मुख्यमंत्र्य़ांनी राजीनामा द्यावा

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निती आयोगासारखीच महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच ‘मित्र’ची स्थापन करून त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने करून चुकीचा पायंडा पाडला आहे. अजय आशर सारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

बच्चन यांच्या दिवार चित्रपटाप्रमाणे त्यांच्या कपाळावर गद्दार असा शिक्का

शिवसेनेत बंडखोरी करून वेगळी चूल मांडणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांवर उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज निशाणा साधला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, जे आमदार खासदार शिवसेना सोडून गेले त्यांच्या कपाळावर ‘गद्दार’ असा शिक्का बसला आहे. ज्याप्रकारे दिवार सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’, असे लिहिले …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०३२ अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान

राज्य शासनाच्या विविध विभागातील नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्राचा ‘महासंकल्प’ कार्यक्रमानिमित्त जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि मृद व जलसंधारण …

Read More »

सीमावासिय परराज्यात जाण्यासाठी उत्सुक तर राज्य सरकार सीमा भागातील बांधवांच्या पाठीशी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील २८ गावांवर दावा सांगितल्यानंतर लगेच सोलापूर जिल्ह्यातील गावांवरही दावा सांगितला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील २८ गावांनी, नांदेड जिल्ह्यातील काही गावांनी आणि गुजरातला लागून असलेल्या सीमावर्ती भागातील अनेक नागरीकांनी गुजरातमध्ये जाण्याबाबतची भूमिका मांडण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर विकासाची गंगा आमच्यापर्यत पोहोचत …

Read More »

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू

प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहीत (पेपरलेस) होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. दरम्यान, केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक …

Read More »