Tag Archives: chief minister

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा तळमळीतूनच होते साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती

वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर बोलताना साहित्यिक आणि साहित्य संमेलनाध्यक्षांना सुखावणारी घोषणा केली असून यापुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना राज्य अतिथींचा (स्टेट गेस्ट) दर्जा देण्यात येत असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली. तसेच मराठी साहित्य मंडळाने राज्य शासनाकडे या …

Read More »

मोसंबी पिकासाठी सीट्रस इस्टेट, सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची घोषणा

बीज गुणन केंद्र इसारवाडी या औरंगाबाद येथील प्रक्षेत्राचे फळ रोपवाटिकेत रूपांतर करून सीट्रस इस्टेट व सेंटर ऑफ एक्सलन्स २२.५० हेक्टर क्षेत्रात तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. सीट्रस इस्टेट व सेंटर ऑफ एक्सलन्स पैठणच्या कार्यवाहीबाबत आज मंत्रालयात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे मुंबई महापालिकेला आदेश, अर्थसंकल्पात या गोष्टींचा समावेश करा दिल्ली, गुडगाव, लखनऊ प्रमाणे मुंबईत एअर प्युरिफायर टॉवर बसवावेत

मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अंतर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांना दिले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, …महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे अधिक पसंतीचे ठिकाण दिघा गावातील प्रकल्पाचे भूमी पूजन केल्यानंतर प्रतिपादन

देशात महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्यात उद्योग स्नेही शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती व कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ‘मैत्री’ अंतर्गत एक खिडकी योजनेतून उद्योगांना सर्व परवाने देण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे अधिक पसंतीचे ठिकाण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णयः अभिमत विद्यापीठांमध्ये स्कॉलरशीप अभिमत विद्यापीठातील मागासवर्गीय विद्यार्थी, शेतकऱ्यांसाठी आणि इतर महत्वाचे निर्णय

मागील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही. त्यामुळे मागील आठवड्यात प्रलंबित राहिलेल्या प्रस्तावावरील सर्व निर्णय आणि चालू आठवड्यात नव्याने दाखल झालेल्या महत्वाच्या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेत मागासवर्गीय विद्यार्थी, शेतकरी, नवी मुंबई शहर, सोलापूर-सातारा जिल्हा, आणि दुय्यम सेवा मंडळाच्या नोकरीसाठी जाणाऱ्या उमेदवारांना एक हजार रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. …

Read More »

आदीवासीबहुल जिल्ह्यातून हि १७ पदे स्थानिक आदीवासींमधून भरण्याचा निर्णय आदिवासी युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा अधिक आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ संवर्गातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  यामुळे आदिवासी युवक – युवतींना रोजगाची संधी उपलब्ध होणार आहे. या बैठकीत राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्रातील १७ …

Read More »

कविवर्य राजा बढे यांचे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” आता राज्यगीत स्वतंत्र राज्यगीताला मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील तेरावे राज्य

कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून  अंगीकारण्यात येणार आहे.  या राज्यगीतासाठी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील …

Read More »

महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रयत्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक …

Read More »

अजित पवार यांची मागणी, वाचाळवीरांना आवरण्यासाठी नवे धोरण आणि कायदा आणा शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी आणि कायदा व सुव्यवस्था यावरून लक्ष हटविण्यासाठी या गोष्टी केल्या जातायत

आम्ही सुरुवातीपासून सांगतोय महापुरुषांबद्दल सातत्याने अपमान करण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. त्यातून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आणि महत्वाचे मुद्दे महागाई, बेरोजगारी आणि आताच्या कायदा व सुव्यवस्था, शेतकर्‍यांचे प्रश्न या समस्या असतील या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. वास्तविक त्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये …

Read More »

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यशः बदलेला अभ्यासक्रम २०२५ पासूनच लागू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्राद्वारे विनंती

MPSC परिक्षेसाठी यंदाच्यावर्षी पासून बदलेला अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला. त्या विरोधात एमपीएससी परिक्षार्थी विद्यार्थ्यांकडून अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. त्यामुळे राज्य सरकारने अखेर बदलेला अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यासंदर्भातील विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात राज्य सरकारकडून जारी करण्यात …

Read More »