मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारीत रस्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला …
Read More »चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली खदखद, एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री… वक्तव्यानंतर भाजपाकडून सारवा सारव
शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री पदावर शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे एकप्रकारची खदखद भाजपामध्ये निर्माण झाली. या खदखदीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच वाट मोकळी करून देत म्हणाले, मनावर दगड …
Read More »दोन वर्षानंतर गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम कोणत्याही अटीविना पण… गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे मिळणार नोंदणी शुल्क, हमी पत्राची अट शिथिल
गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण – उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावेत यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेंतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यानी तातडीने …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून वांद्रे-वरळी सी-लिंक प्रमाणे मुळ गावाजवळ नवा हायटेक ब्रीज कुंभरोषी कलमगांव तापोळा ते अहिर गाव रोड, टी अॅण्ड टी कंपनी कंत्राटदार
मागील साडेसात वर्षापासून नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम ही दोन खाती सांभाळणारे आणि आता मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वरळी ते वांद्रे या सी लिंकची प्रतिकृती असलेला पूल उभारण्यास मान्यता दिली. विशेष म्हणजे हा पूल मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुळगावी असलेल्या ठिकाणाहून जवळच उभारण्यात येणार आहे. तसेच हा पूल …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून त्याचे प्रस्ताव सादर करा पूराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी उपाययोजना करा
पावसामुळे वारंवार येणा-या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील समिती कक्षात राज्यातील गडचिरोली, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्य सचिव …
Read More »मुख्यमंत्री शिंदेचे आदेश; ‘या’ दोन गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा खड्डे बुजविण्याचे काम अहोरात्र सुरु राहणार
मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात आज …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश : ठाण्यातील ‘या’ महानगरपालिकांना अतिरिक्त पाणी द्या दिवा, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, ठाणे जिल्हा व शहर
ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोटय़ातील २० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी कोपरी आणि वागळे इस्टेट परिसर तसेच दिवा परिसरासाठी साडेसहा दशलक्ष लिटर अतिरीक्त पाणी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणीप्रश्नांची आढावा …
Read More »एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज, राज्य सरकारने दिली हमी ठाणे कोस्टल रोड, भुयारी मार्ग, शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी कर्ज
एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात …
Read More »औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतरावर शिंदे-फडणवीस सरकारकडून शिक्कामोर्तब औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नामांतर
अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपल्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र या स्थगितीवरून सर्वचस्थरातून टीका व्हायला लागल्यानंतर …
Read More »नव्या सत्ताधाऱ्यांचे नऊ दिवस संपेना, आधी माईक, नंतर चिठ्ठी आणि आता कानात कुसफुस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेच्या कानात बोलत करून दिली आठवण एमएमआरडीएची
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवून देत नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी झाला. मात्र या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्य मंत्रिमंडळाचा कारभार हाकत आहेत. मात्र या सरकारच्या नव्याचे नऊ दिवस काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत असून मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »
Marathi e-Batmya