मुंबईः प्रतिनिधी राज्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार आणि जालना जिल्हयातील १९ वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबुर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजवून सामुहिक बलात्कार केला होता. त्यात एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या मुलीचा जगण्याशी संघर्ष गुरुवारी संपला. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून मुंबईमध्ये सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. …
Read More »महापालिकेने नोटीस बजाविलेल्या इमारतींचाच पुर्नविकासासाठी विचार राज्य सरकारच्या नव्या धोरणात तरतूद
मुंबईः प्रतिनिधी मुंबई शहरातील १४ हजार ८५८ जून्या व मोडकळीस आलेल्या इमारतीचे रखडलेले पुर्नविकासाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला. मात्र हा पुढाकार घेतना पुर्नविकास योजनेत समाविष्ठ करताना फक्त मुंबई महापालिकेने ३५४ अन्वये ज्या इमारतींना नोटीस बजाविली अशाच इमारतींचा पुर्नविकास योजनेसाठी प्रामुख्याने विचार करण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील …
Read More »१४-१५ सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता नवरात्रीत निवडणूकीची रणधुमाळी तर दिवाळीत सरकार स्थापन होणार
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील निवडणूकीला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीला असून जनतेला खुष करण्यासाठी विद्यमान राज्य सरकारला आणखी १५ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. पुढील सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिने हे सणासुदीचे महिने असल्याने ऐन नवरात्रीत राज्य विधानसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी तर दिवाळी नव्या स्थानापन्न होणाऱ्या सरकारला जनतेसोबत साजरी करायला मिळणार आहे. विद्यमान …
Read More »सांस्कृतिक संचालनालयाच्या निमंत्रण पत्रिकेवर “संचालक” चेच नाव गायब प्रभारी संचालकाने स्वतःचा उल्लेख संचालक असा केल्याने सांस्कृतिक कार्य मंत्री कार्यालयाचा बडगा
मुंबई: प्रतिनिधी यापुढे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या प्रभारी संचालक यांनी कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवर आपल्या नावाचा आणि पदाचा नामोल्लेख करू नये.अशा स्पष्ट सूचना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या कार्यालयातून दिल्याचे विश्वासनिय सूत्रांनी दिली. श्रीमती स्वाती काळे ह्या ११जुलै २०१९ रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर संचालक पदाचा कार्यभार सध्याच्या सह संचालक यांच्याकडे …
Read More »ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मान्यवर ज्येष्ठ (वृद्ध), साहित्यिक कलावंतांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आजच्या या निर्णयानुसार सन्मानार्थी कलावंतांचे मानधन दीड पटीने वाढणार असून त्याचा लाभ राज्यातील २६ हजार मान्यवरांना होणार आहे. यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातील सन्मानार्थींसाठी ६० इतक्या इष्टांकाची मर्यादा …
Read More »जून्या व मोडकळीस इमारतींच्या पुर्नविकासासाठी अधिनियमात दुरूस्ती म्हाडाची नियोजन प्राधिकारी नियुक्तीचा मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यासह म्हाडा अधिनियम १९७६ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास तसेच उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाला नियोजन प्राधिकारी म्हणून घोषित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई शहरातील उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारती तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण …
Read More »विधानसभेसाठी भाजपा-शिवसेनेत झटपट युती होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
बीडः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या आधी माध्यमांनी भरपूर चर्चा केली की भारतीय जनता पार्टी – शिवसेना युती होणारच नाही पण आम्ही एका दिवसात युती केली आणि घोषणा केली. आताही विधानसभा निवडणुकीत असेच होईल. तुमच्या लक्षातही येणार नाही, अशी झटपट युती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. महाजनादेश …
Read More »महसूल विभागातील संगणक माहिती चोरीमागे बदली-बढतीतील दलालांची लॉबी बदल्यांच्या टेबलवर मंत्र्यांच्या मर्जीतील पदमुक्त न झालेले अधिकारी
मुंबईः खास प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या बढत्या आणि बदल्यांची प्रक्रिया सध्या महसूल विभागात सुरु आहे. मात्र या बदल्या आणि बढत्या प्रक्रिया ज्या टेबलवर सुरु आहेत. त्या टेबलच्या कार्यकक्षेच्या संगणकातील माहितीची चोरी झाल्याने या चोरीमागे दलालांची लॉबींग तरी कारणीभूत नाही …
Read More »राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातच माहितीची चोरी? इन्फोटेक कंपनीच्या एकास अटकः पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या महसूली कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील महसूल विभागात महसूली अधिकाऱ्यांच्या बदली-बढतीचा मोसम सुरु आहे. या मोसमातच मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील महसूल विभागातील माहीतीची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यातील संपूर्ण महसूली अर्थात जमिनी, महसूली उत्पन्न अर्थात कर संकलन, रेडीरेकनरमधून मिळणारे उत्पन्न आदींची माहिती मंत्रालयातील महसूल विभागात आहे. …
Read More »राज्यातील बेरोजगारीने गाठली परिसीमा; ३२ हजार जागांसाठी ३२ लाख अर्ज सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच उद्योग क्षेत्र संकटात असल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी आर्थिक मंदीची झळ महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रालाही बसलेली असून औरंगाबाद, नाशिक, पिंपरी चिंचवडमधील मोठ्या कंपन्यांनी उत्पादन कमी केल्यामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच हे संकट ओढवले असून सरकारने लक्ष घालून या मंदीची झळ कामगारांना बसणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी …
Read More »
Marathi e-Batmya