बारामती : प्रतिनिधी ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती’ कार्यक्रम हा राज्यशासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून पाच वर्षात एक लाख सूक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित करण्याचे उदिष्ट असल्याचे सांगतानाच, या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात उद्योजक तयार होतील. रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »१ फेब्रु.पासून या वेळेतच सर्वांना लोकल प्रवास करता येणार कार्यालयीन वेळा बदलण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सूचना
मुंबई : प्रतिनिधी कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानुसार सर्वसामान्य नागरीकांसाठी लोकलने प्रवास करण्याच्या वेळा निर्धारीत करण्यात आल्या असून तीन टप्प्यात …
Read More »मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी ‘मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल’, असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबाराला उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पवार म्हणाले की, कर्नाटकमधल्या नागरिकांना बरे …
Read More »आयोगाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांची वर्णी कि राज्याच्या मुख्य सचिवांची ? निवड समितीच्या अध्यक्षांनीच भरला अर्ज
मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील तीन महिन्यापासून एमईआरसी अर्थात वीज नियामक आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी सनदी अधिकाऱ्यांकडून लॉबींग सुरु असतानाचच आता या निवड समितीचे अध्यक्ष पदी असलेल्या राज्याच्या मुख्य सचिव संजयकुमार यांनी आयोगाच्या अध्यक्ष पदी आपला अर्ज भरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सध्या राज्याच्या वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी आनंद …
Read More »लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी लवकरच…पण १ फेब्रुवारीपासून नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य मुंबईकरांना मागील १० महिन्यापासून लोकलने प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. मात्र आता ही बंदी लवकरच उठविण्यात येणार असून याबाबतचा निर्णय लवकरच सर्वांसाठी सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. मात्र लोकल सेवा सर्वांसाठी १ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्यात …
Read More »भाजपा खासदाराने सांगितले, राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची कंपनी काढणार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यात नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, रोगराई आदींमुळे शेतकऱ्यांची उभी पिके हाताची जावून आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. त्यातच अनेक पीक विमा कंपन्या या पंचनामे करून विम्याचे पैसे शेतकऱ्याला देत नसल्याने शेतकऱ्यांची एकप्रकारे फसवणूकच होते. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून राज्य सरकार स्वत:च पीक विमा कंपनी काढणार …
Read More »सरकारचा मोठा निर्णय : आदिवासी विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाचा खर्च सरकार उचलणार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणसाठी दिली जाणार शिष्यवृत्ती
नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी आदिवासी विकास विभागार्फत शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार, शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याचे कमाल वय ३५ वर्षे असावे. नोकरी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कमाल वयोमर्यादा …
Read More »सिरमची लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही मुख्यमंत्र्यांकडून सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी केल्यानंतर माहिती
पुणे : प्रतिनिधी सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हीशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. …
Read More »मुख्यमंत्री म्हणाले, पक्षभेद विसरा- विकास कामासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा सर्वपक्षिय खासदारांच्या बैठकीत आवाहन
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व खासदारांनी पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा असे आवाहन करतानाच खासदारांचे जे विषय राज्य शासनाकडे आहेत त्याबाबत विभागवार बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे राज्याचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी …
Read More »मेट्रो कारशेड जागाबदलासाठी नवीन समितीचा निव्वळ फार्स, अहवाल आधीच तयार! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई: प्रतिनिधी मेट्रो-3च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी आधीच अहवाल तयार करून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स करण्यात येत आहे. यातून मुंबईकरांना मेट्रो विलंबाने मिळेल आणि राज्याचेही मोठे आर्थिक नुकसान होईल. याबाबत प्रशासकीय अधिकार्यांकडून मुख्यमंत्र्यांची मोठी दिशाभूल होत असल्याचा आरोप एका पत्राद्वारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …
Read More »
Marathi e-Batmya