काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील मानहानीचा खटला, त्यानंतर न्यायालयाने सुनावलेली शिक्षा आणि राहुल गांधी यांची रद्द झालेली खासदारकी यावरून आता देशातलं राजकारण चांगलंच तापलेले असून या केंद्र सरकारने केलेल्या या कारवाईवरून काँग्रेससह अनेक राजकिय पक्षांकडून केंद्रातील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला भाजपाचे नेते आणि राष्ट्रीय …
Read More »सतेज पाटील यांचे आव्हान; लांग घातली होती, तर कुस्ती खेळायची होती महाडिक गटाने आक्षेप घेताच, सतेज पाटील गटाचे २७ उमेदवार अपात्र
कोल्हापूरातील श्री छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीतील रंगत आता चांगलीच वाढत चालली असून या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सत्ताधारी महाडिक गटाकडून पोटनियमातील तरतुदीनुसार २७ जणांवर हरकत घेतली होती. त्यांना आता अपात्र ठरवण्यात आलं आहे. यानंतर सतेज पाटील यांनी महाडिकांना थेट आव्हान देत …
Read More »काँग्रेसचा गौप्यस्फोट, अदानी उद्योगात २० हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये चीनी नागरिक अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून करण्यास मोदी सरकार का घाबरते ?: पवन खेरा
अदानी उद्योगसमुहात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाची? या गुंतवणुकीत चीनच्या एका नागरिकाचा समावेश आहे, तो चिनी नागरिक कोण? याची माहिती देशातील जनतेला झाली पाहिजे म्हणूनच राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. अदानी घोटाळ्याचे ‘दूध का दूध व पाणी का पाणी’, करायचे असेल तर संयुक्त संसदीय समिती (JPC) …
Read More »लोकसभा हाऊस कमिटीच्या पत्राला राहुल गांधी यांनी ‘हे’ दिले खोचक उत्तर माझ्या अधिकाराबाबत कोणतीही गोष्ट आडवी न येता तुमच्या पत्रातील बाबींचे पालन करेल
सूरत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर केंद्रातील मोदी सरकारने राहुल गांधी यांना कोणतीही संधी न देता लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याचे आदेश जारी केले. त्यानंतर लगेच खासदारांसाठी असलेला बंगलाही रिक्त करण्याची नोटीस लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना बजावली. या साऱ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज पहिल्यांदाच लोकसभा हाऊस …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, …लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपाकडे उत्तर नाही
भारतीय जनता पक्षाकडे देशातील जनतेला भेडसावत असलेल्या ज्वलंत समस्यांवर कोणतेही उत्तर नाही. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी झालेले आहे. जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे, त्यावर भाजपा उत्तर देऊ शकत नाही म्हणूनच जनतेच्या मुळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा पुढे करण्यात आलेला आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …
Read More »उध्दव ठाकरेंच्या त्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचा सवाल, म्हणजे नेमके काय करणार? सावरकरांचा अपमान झाल्या तेव्हा यांचे नेते मूग गिळून गप्प
काल मालेगांव येथे झालेल्या जाहिर सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वा.सावरकर प्रश्नावरून इशारा दिला. त्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांचा फोटो दाखवत उध्दव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले, वीर सावरकरांचा अपमान झाला तेव्हा यांचे नेते मूग गिळून गप्प होते, …
Read More »खासदारकी रद्द नंतर आता लोकसभेने पुन्हा बजावली राहुल गांधी यांना नोटीस न्यायालयाच्या निकालानंतर कोणतीही संधी न देता आता घर खाली करण्याची नोटीस बजावली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टिप्पणी करताना सगळे चोर मोदीच का असतात? अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यानंतर गुजरातमधील भाजपाच्या माजी आमदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत मोदी समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला होता. त्यावर गुजरातमधील सूरत …
Read More »उध्दव ठाकरेंनी ठणकावल्यानंतर नाना पटोले यांचे मोठे विधान, काँग्रेस धर्माचा…. लोकशाही व संविधान वाचवण्याच्या लढाईसाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र
सावरकरांच्या मुद्द्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस पक्षाचे विचार वेगवेगळे आहेत हे सर्वश्रुत आहे. काँग्रेस पक्षाने विचारांशी कधीच तडजोड केलेली नाही. काँग्रेस सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करणारा पक्ष असून कुठल्याची धर्माचा वा व्यक्तीचा द्वेष करत नाही. सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन काँग्रेस जात असते. सावरकर मुदद्यांवर राहुल गांधी व उद्धव …
Read More »उध्दव ठाकरे यांनी राहुल गांधीना ठणकावलं, सावरकर आमचे दैवत…बोलेलं खपवून घेणार नाही काही जण तु्म्हाला सावरकर बोलण्यासाठी डिवचतायत
तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली. आम्ही तुमच्यासोबत असल्याने महाराष्ट्रात आदित्य ठाकरे तर काश्मीरमध्ये संजय राऊत सहभागी झाले. आता आपण देशाच्या लोकशाहीसाठी एकत्र आलेलो आहोत. पण आज राहुल गांधी यांना जाहिरपणे सांगतोय की, स्वा.सावरकर हे आमचं दैवत आहे. त्यांच्यावर बोललं चालणार नाही असे ठणकावून ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव …
Read More »संकल्प सत्याग्रहात काँग्रेसचा इशारा, पंतप्रधान मोदींना उत्तर द्यावेच लागेल राहुल गांधींवरील कारवाई दडपशाही व हुकूमशाहीचे उदाहरण, काँग्रेस अशा कारवाईला घाबरत नाही- पृथ्वीराज चव्हाण
राहुल गांधी यांनी अदानी उद्योग समुहातील महाघोटाळा उघड केल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारची जगभर नाच्चकी झाली आहे. अदानीच्या कंपनीत वीस हजार कोटी रुपयांचा काळा पैसा आला तो कोणाचा आहे याची चौकशी करण्याची मागणी करत राहुल गांधींनी अदानी-मोदींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळेच राजकीय आकसातून त्यांच्यावर कारवाई केली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …
Read More »
Marathi e-Batmya