सर्वोच्च न्यायालयाचा सन्मानच आहे परंतु नोटबंदी संदर्भातील निर्णय दुर्दैवी आहे. नोटबंदीला आता बराच कालावधी झाला असून आर्थिक निर्णयाची प्रक्रिया (रिव्हर्स) मागे घेता येत नसेल व त्याचा फायदाही होणार नाही या अनुशंगाने न्यायालयाने विचार केला असावा. पण मोदी सरकारने केलेल्या नोटंबदीचा कोणताही उद्देश मात्र सफल झालेला नाही हे विसरून चालणार नाही …
Read More »अध्यक्षांवरील विरोधकांचा अविश्वासाचा ठरावः अजित पवार म्हणाले, माहिती नाही काँग्रेससह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी अविश्वास ठराव दाखल केल्याची चर्चा
नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे सातत्याने विरोधी बाकावरील सदस्यांना बोलू देत नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी विधानसभाध्यक्षांना उद्देशून तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका असा इशारा दिला. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर विधानसभेने निलंबनाची कारवाई केली. मात्र शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या काही आमदारांनी थेट …
Read More »काँग्रेस म्हणते, एमपीएससीने विद्यार्थी हितासाठी अहंकार बाजूला ठेवावा एमपीएससीच्या लढ्यात काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांसोबत
एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा देऊन प्रशासनात अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पहात असतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी आयोगाच्या परिक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेतात. आयोगाने परिक्षा पद्धतीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर बदल करुन तो २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाचे आकलन करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा …
Read More »नाना पटोलेंची मागणी, राज्यात जातनिहाय जनगणना करा काँग्रेसशासित राज्यात जुनी पेन्शन योजना लागू मग महाराष्ट्रातही का नाही ?
ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे पण केंद्र सरकार मात्र तशी जनगणना करत नाही. काही राज्य सरकारांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनेही इतर राज्य सरकारप्रमाणे आपल्या राज्यातही जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली. प्रसार माध्यमांना माहिती देताना नाना …
Read More »रूग्णालयातून बाळासाहेब थोरात यांनी मांडली अब्दुल सत्तारप्रकरणी सत्यता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेले आरोप खोटे व दिशाभूल करणारे
राज्याचे तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भूखंड वाटपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढत दोषी ठरविले. त्यावरून विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासागहेब थोरात यांच्यावर आरोप केले. सध्या दुखापतीमुळे मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी रूग्णालयातून विखे-पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर …
Read More »कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांबद्ल जशी आग ओकली त्याला प्रतिउत्तरच नाही भारतीय जनता पक्षाची भूमिका सीमाप्रश्नीही नेहमीप्रमाणे संदिग्धच-नाना पटोले
सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटक सरकारने टार्गेट करत त्यांच्यावर अत्याचार केले, त्यांच्या गाड्या फोडल्या. महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतरही कर्नाटकाने कुरापती थांबवल्या नाहीत. महाराष्ट्रातील मंत्री सीमाभागात जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती असताना सभागृहात ठराव मांडताना कर्नाटक सरकारला खडेबोल सुनवायला पाहिजे होते. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांबद्दल ज्याप्रमाणे आग ओकली, …
Read More »महाविकास आघाडीचे शिंदे सरकार विरोधात दिंडीच्या माध्यमातून अनोखे आंदोलन… सातव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार भ्रष्टाचारी मंत्र्याच्या विरोधात आक्रमक...
शेतकरी हैराण सरकार खातो गायरान… खोके लुटा कधी गायरान लुटा… सुरतला चला कधी गुवाहटीला चला… ५० द्या कुणी ८२ द्या, शिंदे सरकारला द्या…भूखंड घ्या कुणी गायरान घ्या सत्तारला द्या कुणी राठोडला द्या… गद्दार बोलो कभी सत्तार बोलो… राजीनामा द्या राजीनामा द्या,भूखंडाचा श्रीखंड खाणारे राजीनामा द्या… जनतेकडून पैसे घेणार्या अब्दुल सत्तार …
Read More »गली गली मे शोर है खोके सरकार चोर है सहाव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक ; विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी...
बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या ,मुख्यमंत्री राजीनामा द्या… द्या खोके, भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके… कर्नाटक सरकार हाय हाय… मिंथे सरकार हाय हाय… निर्लज्ज सरकार हाय हाय… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… गली गली मे शोर है खोके सरकार चोर …
Read More »अजित पवार यांचा सवाल, जाहिर केल्याप्रमाणे सीमाप्रश्नी विधेयक का आणले नाही? सीमावादावर ठराव आणण्याबाबत विरोधक आक्रमक, देवेंद्र फडणवीसांची माघार
कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विरोधात पुन्हा एकदा भूमिका मांडली. मात्र मुंबईत झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीत सीमाप्रश्नी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानसभेत ठराव मांडून तो मंजूर करण्याचे ठरले. मात्र दुसरा आठवडा सुरु झाला तरी अद्याप ठराव का आणला जात नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. विधानसभेचे …
Read More »अशोक चव्हाण म्हणाले, सत्ताधाऱ्यांचे वर्तन लोकशाहीला काळीमा फासणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनावरून साधला निशाणा
हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांचे वर्तन महाराष्ट्राचे नुकसान करणारे आणि लोकशाहीला काळीमा फासणारे असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. शुक्रवारी सकाळी विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. अशोक चव्हाण म्हणाले की, नागपूर हिवाळी …
Read More »
Marathi e-Batmya