Tag Archives: congress

काँग्रेसची टीका, राजीनामा मंजूर करून केंद्राने कोश्यारींचा सन्मान केला तर महाराष्ट्राचा अवमान कोश्यारींच्या पापाची फळे भाजपाला भोगावी लागतील

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून केंद्र सरकारने कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. भगतसिंह कोश्यारीच्या आडून भारतीय जनता पक्षाने सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमानच केला. कोश्यारींनी राजभवनासारख्या घटनात्मक संस्थेचा भाजपा कार्यालयाप्रमाणे वापर करून राजकारणाचा अड्डा बनवले होते. कोश्यारींच्या हाताने महाराष्ट्रद्रोही भाजपने जी पापे केली …

Read More »

नाना पटोलेंची मागणी, शेतकरी लाठीचार्जची विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करा शेतकऱ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी पोलिस अधिक्षकाला तात्काळ निलंबित करा

शेतमालाला दववाढ मिळावी व पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केला. आपल्या न्याय व हक्कासाठी लढा देणाऱ्या अन्नदात्यावर भाजपा सरकारने निर्दयीपणे लाठीहल्ला केला. या लाठीचार्ज प्रकरणी बुलढाणा पोलिस अधिक्षकांना तात्काळ निलंबित करावे व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी …

Read More »

काँग्रेसची मागणी, पत्रकार वारिशेंच्या हत्येचा तपास न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करा पत्रकार शशिकांत वारिशेंच्या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण? हे जनतेसमोर आले पाहिजे

रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या संशयास्पद आहे. या हत्येमागे कोणा कोणाचे हितसंबंध आहेत हे उघड होणे गरजेचे आहे. वारिशे हत्याप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आलेली असली तरी या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे? हे जनतेसमोर आले पाहिजे. यासाठी शशिकांत वारिशे हत्याप्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश …

Read More »

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरील टीकेला फडणवीसांचे उत्तर,… ते काही ना काही घेऊन येतात काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रत्युत्तर

महिनाभरात दुसऱ्यांदा वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या दोन गाड्यांना हिरवा कंदील दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले. या दौऱ्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी आले म्हणजे निवडणूका जवळ आल्याची खोचक टीका केली. त्यातच आगामी मुंबई महापालिका निवडणूकांच्या तोंडावर सर्व राजकिय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली. या साऱ्या पार्श्वभूमीवर …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, भाजपासाठी सावेंकडून मंत्रिपदाच्या घटनात्मक शपथेचा भंग सहकार मंत्री अतुल सावे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा

महाराष्ट्रात सहकारी संस्था काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी अनेक वर्षांच्या मेहनत व परिश्रमाने उभ्या केल्या आहेत. भाजपाला हेच खूपत असल्याने आता केवळ भाजपा जिल्हाध्यक्षांच्या शिफारसीवरच सहकारी संस्थांची नोंदणी देऊ असा फतवा सहकारमंत्री अतुल सावे यांनी काढला आहे. सहकार मंत्र्यांचे हे वर्तन मंत्रिपदाच्या शपथेचा भंग असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अतुल सावे यांची …

Read More »

नाना पटोलेंचा खोचक टोला, पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा आले म्हणजे निवडणूका जवळ आल्या अदानी’ संदर्भात राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नावर मोदी कधी बोलणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिनाभरातच मुंबईचा दुसरा दौरा केला याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीशिवाय मोदींना मुंबई, महाराष्ट्राची आठवण होत नाही. जानेवारीत मेट्रोचे उद्घाटन व आता वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ निमित्त आहे. मोदींच्या दौऱ्याने कसलाही फरक पडत नाही मात्र मुंबईच्या दुसऱ्या दौऱ्यात तरी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील …

Read More »

काँग्रेसची मागणी, MPSC ने नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीतील संभ्रम दूर करावा नवा अभ्यासक्रमानुसार २०२५ पासून परिक्षा घेण्याचे प्रसिद्धीपत्र आयोगाने जाहीर करावे

MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२३ पासून करण्याऐवजी २०२५ पासून करावी असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. परंतु एमपीएसीने राज्यसेवा परिक्षेसंदर्भात अजूनही या निर्णयाबद्दल स्पष्टपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. दोन दिवसापूर्वी आयोगाने कृषी, वन, अभियांत्रिकी या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने २०२३ पासून होतील असे जाहीर केले …

Read More »

ठाकरे गटाच्या टीकेवर अतुल लोंढे म्हणाले, पटोलेंचा राजीनामा अध्यक्षांच्या सूचनेनुसार मित्रपक्षाच्या निर्णयावर मतमतांतर व्यक्त करणे अयोग्य

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे …

Read More »

डॉ प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची आई म्हणाली, दारूच्या नशेत केलं… सातव यांच्या कोहिनूर बंगल्यासमोर हल्लेखोर महेंद्र डोंगरदिवेच्या आईनी मांडली व्यथा

कोविड काळात काँग्रेसचे दिवंगत आमदार राजीव सातव यांच्या झालेल्या निधनानंतर पत्नी आणि विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवारी रात्री हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला. प्रज्ञा सातव यांनी स्वत: या प्रकाराची माहिती दिली आहे. हिंगोलीतील कळमनुरीच्या कसबे धवंडा गावात प्रज्ञा सातव गेल्या असता हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, पत्रकार वारिशे यांची हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा करा शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे

राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसाढवळया हत्या करण्यात आली आहे. ही घटना अपघात आहे असे दाखवण्याचा बनाव करण्यात आला परंतु ही हत्या असल्याचे उघड झाले आहे. पत्रकार वारिशे यांची हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. यासंदर्भात …

Read More »