Tag Archives: congress

नाना पटोले यांचा इशारा, बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा दिल्लीतील हस्तकांची महाराष्ट्रात दादागिरी चालू देणार नाही

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करुन सर्वेक्षण केले जात आहे. या पोलीस दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून पोलीस बळावर कोणाचा विकास साधायचा आहे? स्थानिक जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादणे ही हुकूमशाही असून कोणत्याही परिस्थिती भाजपा सरकारची ही दादागिरी सहन केली जाणार नाही. बारसू रिफायनरीसाठी …

Read More »

बीकेसीतील ‘वज्रमुठ’ सभेसाठी काँग्रेसच्या या ६ नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी महाराष्ट्र दिनी जंगी सभेसाठी सोपविली जबाबदारी

महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेच्या माध्यमातून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले असून मुंबईतील बीकेसी मैदानावर सोमवार १ मे रोजी महाराष्ट्र दिनी विशाल वज्रमूठ सभा होत आहे. या सभेच्या नियोजनात काँग्रेस पक्षही मोठ्या ताकदीने कामाला लागला असून सभा यशस्वी करण्यासाठी सहा नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. बीकेसी मैदानावर होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ …

Read More »

नाना पटोले यांची माहिती, मुंबईतील १ मे रोजीच्या वज्रमूठ सभेसाठी काँग्रेसची जय्यत तयारी टिळक भवनमध्ये कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक संपन्न

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर होत असून छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील सभेनंतर तिसरी सभा मुंबईत होत आहे. दोन्ही सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आता मुंबईतील सभेच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून मुंबईतील सभेच्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. पत्रकारांनी …

Read More »

काँग्रेसची भूमिका स्पष्ट, भाजपाविरोधात लढण्यासाठी जे एकत्र येतील त्यांच्यासह लढू हिम्मत असेल तर खारघर घटनेची उच्च न्यायालयातील न्यायाधीशांकडून चौकशी करा

राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. लोकशाही, संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. भाजपाच्या या मनमानी कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट असून या लढ्यासाठी जे पक्ष बरोबर येतील त्यांना एकत्र घेऊन लढा दिला जाईल, असे …

Read More »

शरद पवार यांचे पुन्हा संभ्रमातित वक्तव्य; २०२४ ला मविआ म्हणून लढण्याचा निर्णय….. राजकिय वर्तुळात तर्त-वितर्कांना उधाण

राज्यातील विरोधकांकडून एकाबाजूला भाजपाला हरविण्यासाठी विविध पातळीवर मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु असतानाच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात परस्पर विरोधी भूमिका असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अदानीप्रकरणी जेपीसी काँग्रेसची भूमिका असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …

Read More »

कल्याण आयुक्त रविराज इळवे यांना तातडीने निलंबित करा काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

राज्यातील कल्याण निधी भरणाऱ्या ४ कोटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना गुणांना वाव देण्यासोबतच त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी याकरिता विविधांगी कल्याणकारी उपक्रम, योजना राबवण्याकरिता कामगार कल्याण मंडळाची निर्मिती झाली आहे. परंतु मंत्रालयातील कामगार विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हाताशी धरून कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, ‘२ दिवसात आरक्षण देतो’ म्हणणारे फडणवीस कोणत्या बिळात लपले? भाजपा इमानदार असेल तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याचा संसदेत कायदा करा

मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटळाल्याने शिंदे-फडणवीस सरकारने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक अशी कोणतीही याचिका दाखल करुन आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाला आरक्षणाला लाभ मिळण्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागेल आणि ही मर्यादा सर्वोच्च न्यायालयात नाही तर संसदेतून हटवली जाते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष …

Read More »

राहुल गांधी यांनी बंगला केला रिकामा चावी देताना म्हणाले, खरं बोलण्याची किंमत… हसतमुखाने बंगल्याची चावी केली अधिकाऱ्यांच्या हाती सुपुर्द

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे सुरत न्यायालयानं त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना ३० एप्रिलपर्यंत बंगला रिकामा करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार ३० एप्रिलपूर्वीच राहुल गांधी यांनी बंगला रिक्त करत आज स्वतः बंगल्याला कुलुप लावत …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, चव्हाण सरकारबदद्ल… तर अजित पवारांनी तेव्हाच बाहेर पडायचे ना सत्यपाल मलिकांनी मोदींचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्यानेच सीबीआयकडून नोटीस

पुलवामा घटना झाली त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते, त्यावेळच्या घटनेचे सत्य त्यांनी जनतेसमोर उघड केले. आपल्या जवानांवर केलेला तो भ्याड हल्ला आहे, त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे पण उत्तर न देता नरेंद्र मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला म्हणूनच सत्यपाल मलिकांना सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली आहे, असा …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, खारघर प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गप्प का ? खारघर प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय सरकारी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात १४ लोकांचा मृत्यू हे शिंदे-फडणवीसांच्या निर्लज्ज सरकारचे बळी आहेत. सरकार आजही या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहे. खारघर घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली एक सदस्यीय समिती ही केवळ धुळफेक आहे. सरकारच सरकारची चौकशी करत असेल तर ती निष्पक्ष कशी …

Read More »