Tag Archives: congress

गोव्यात महाविकास आघाडी लढणार की नाही? नवाब मलिकांनी केले स्पष्ट एकला चलो रेचा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार

मराठी ई-बातम्या टीम देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मणिपूर, उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करून तर गोव्यात तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत महाविकास आघाडी करून लढणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता गोव्यात एकला चलो रेचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

विचारसरणी लादण्यासाठी पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा स्टार प्रवाह वाहिनीला आणि भाजपाला दिला इशारा

मराठी ई-बातम्या टीम अभिनेते किरण माने यांनी त्यांचे विचार समाज माध्यमावर व्यक्त करून कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे. सरकारच्याविरोधात मत व्यक्त केले म्हणून त्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का? असा संतप्त सवाल विचारत, महाराष्ट्र हे कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे …

Read More »

फडणवीस म्हणाले “पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी मागे रॅशन्लीस्ट” गोव्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला दावा

मराठी ई-बातम्या टीम पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात त्यांच्या सुरक्षा प्रश्नाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत याप्रकरणी एका समितीची स्थापनाही केली. त्या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच पंतप्रधानांच्या त्या दोऱ्यात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवण्यात आली होती अशी माहिती तेथील अधिकारीच देत असल्याचा दावा भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. गोवा …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय: वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला निर्णय

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूच्या प्रभावामुळे राज्यातील वैद्यकीय विभागाकडून १७ आणि ३१ जानेवारी २०२२ पासून घेण्यात येणाऱ्या परिक्षा  एक महिना पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व परिक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. त्याचबरोबर मागील काही …

Read More »

प्रियंका गांधी यांनी सांगितला स्व. इंदिरा गांधी यांचा “तो” धाडसाचा किस्सा मात्र आवडत्या राजकारणी आहेत न्युझीलंडच्या पंतप्रधान

मराठी ई-बातम्या टीम काँग्रेसच्या पक्षातंर्गत राजकारणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबरीने प्रियंका गांधी-वड्रा यांही सक्रिय झालेल्या आहेत. मात्र त्यांनी आज पहिल्यांदाच सोशल मिडियातून त्यांनी देशभरातील महिलांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना स्व.इंदिरा गांधी यांच्याबद्दल एक आठवण सांगण्याची विनंती केली असता त्यांनी इंदिरा गांधी यांच्या धाडसाचा किस्सा सांगितला. प्रश्नकर्त्या महिलेने प्रियंका गांधी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयामुळे “त्या” विषयावरील राजकारण थांबेल राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचे प्रतिपादन

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षणातील त्रुटीचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी होवून योग्य तो निर्णय होईल. तसेच याप्रश्नावरून सुरु झालेले राजकारण थांबेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री …

Read More »

पटोलेंचे चंद्रकांत पाटील यांना आव्हान, तोंड उघडाच मर्यादेत रहा च्या इशाऱ्यानंतर नाना पटोलेंचे उत्तर

मराठी ई-बातम्या टीम   सत्ता गेल्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढळले आहे. त्यांनी वारंवार तोंड उघडायला लावू नका चे पोकळ इशारे देण्यापेक्षा एकदा तोंड उघडावेच म्हणजे त्यांच्या तोंडात किती हवा आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला कळेल आणि त्यांच्या डोक्यात काय सुरु आहे तेही कळेल असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …

Read More »

फडणवीस म्हणाले, … काँग्रेस नेत्यांनी निर्लज्जतेचा कळस गाठलाय पंजाबमधील घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करा

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी करत त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी बेशर्मपणे प्रतिक्रिया व्यक्त करत निर्लज्जतेचा कळस गाठला असल्याची टीका केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात फडणवीस बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपाच्या …

Read More »

सुरक्षेचा मुद्दा पुढे करुन भाजपाने कांगावा करू नये मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले !: नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय रंग देण्यात येत आहे. वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले, त्यांच्या मार्गात खिळे ठोकले, शेतकऱ्यांची डोकी फोडली. पंजाबमधला शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. …

Read More »

मोठी बातमी: पंजाबमध्ये मोर्चेकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखले १५ ते २० मिनिटे रस्त्यातच पंतप्रधानांना थांबावे लागले

मराठी ई-बातम्या टीम पंजाब विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोर्चेकऱ्यांच्या प्रखर विरोधामुळे अखेर दौरा रद्द करण्याची वेळ आली. परंतु भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या प्रकारास पंजाबच्या काँग्रेसला जबाबदार धरले असून मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी हे साधे फोन घ्यायला तयार नसल्याचा आरोप केला. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर …

Read More »