Tag Archives: covid-19

रूग्णालये ऐकत नाहीत.. परवाने रद्द- फौजदारी कारवाई करणार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी गरीब व गरजू नागरिकांवरील उपचारासाठी खाजगी रूग्णालयात राखीव ठेवण्यात आलेल्या खाटांसह ८० टक्के खाट राज्य सरकारने ताब्यात घेतले आहेत. तरीही खाजगी रूग्णालयांकडून जर मनमानी पध्दतीने बीलांची वसूली केली तर सदर दवाखान्यांची नर्सिंग परवाने रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खाजगी …

Read More »

आपतकालीन परिस्थितीतही चॅरिटेबल रूग्णालयांतील खाटा रिकाम्या आणि सरकार ढिम्म १७४० पैकी १५४० खाटांवर गरीब आणि गरजू रूग्ण नाहीच:

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आणि मुंबई महापालिका यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी खासगी रूग्णालयातील ८० टक्के खाटा अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच राज्य सरकारच्या जीवावर मुंबई आणि उपनगरात स्वत:च्या अलिशान हॉस्पीटलसाठी कवडीमोल भावात किंवा स्वस्तात जमिनी मिळविणाऱ्या चॅरिटेबल अर्थात धर्मादाय रूग्णालयांनी गरीब, गरजू …

Read More »

रेकॉर्ड ब्रेक संख्या रूग्णांची मुंबईत तर राज्यात मृतकांची १४११ रूग्ण मुंबईत तर ७४ मृत पावले राज्यात

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून एकट्या मुंबईत दिवसभरात १४११ रूग्ण आढळून आले तर राज्यात उर्वरीत असे मिळून २ हजार १२७ रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्यातील रूग्णांची संख्या ३७ हजार १३६ झाले असून राज्यात ७४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. …

Read More »

शेतकऱ्यांसाठी खुषखबर, सौर कृषिपंप नादुरुस्त झालाय नविन मिळणार ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी महावितरणकडून राज्यभरात कार्यान्वित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील तीन किंवा पाच एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप तांत्रिक बिघाडासह वादळी पाऊस, गारपिट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरुस्त झाल्यास ते पूर्णपणे मोफत दुरुस्त करून किंवा बदलून देण्याची घोषणा महावितरणने केली असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या राज्यात वादळी पाऊस …

Read More »

भायखळ्यात तापाची साथ, अधिकारी म्हणतात- नगरसेवकाने सांगितले तरच येवू वैद्यकीय शिबिरे घेण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत भायखळातील बालाजी हॉस्पिटल परिसर या ठिकाणी ३ कोरोना बाधीत रुग्न आढळले असुन ४ आठवड्या पासुन येथे तापाची साथ चालु आहे. नागरीक भयभीत झाले असुन वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्याची मागणी करण्यात येत आहे. संपुर्ण जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले असुन आपला भारत देश देखील कोरोनाच्या कचाट्यातुन …

Read More »

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वरील बंदी वर्षासाठी शिथिल करा आमदार अॅड. आशिष शेलारांचे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती ऐवजी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीचा आग्रह धरणे निसर्गाच्या दृष्टीने कधीही योग्यच आहे. मात्र यावेळी आलेले कोरोनाचे संकट, त्यामुळे मूर्तिकारांना मिळालेला अपुरा वेळ व अडचणीत आलेली अर्थव्यवस्था या सगळ्याचा विचार करता केवळ या वर्षभरासाठी केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वर घातलेली बंदी शिथिल करावी, …

Read More »

कोरोनाकाळासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला ८ कलमी कार्यक्रम कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थितीबाबत शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थिती, आव्हाने, प्रतिबंधात्मक उपाय, विविध वर्गांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज चर्चा केली. यामध्ये वाहतूक, शिक्षण, शेती, उद्योग अशा विविध विषयांवर शरद पवार यांनी सूचना मांडल्या. १) कोविड-१९ व लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे …

Read More »

कोरोनाचे आज २०३३ नवीन रुग्ण; राज्याची संख्या ३५ हजार ५८ वर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. आज २०३३ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ७४९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४३७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज …

Read More »

बालनाट्य, हलक्याफुलक्या नाटकांचा कर्ता हरपला जेष्ठ साहित्यिक, रंगकर्मी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे निधन :नामवंतांची श्रध्दांजली

मुंबई : प्रतिनिधी मराठी साहित्यात वाचकांना वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथांची ओढ लावणाऱ्या रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. मतकरी यांना काही दिवस थकवा जाणवत होता. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तपासणी दरम्यान मतकरी यांना कोव्हीड १९ चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न …

Read More »

वाधवानप्रकरणातील वादग्रस्त अधिकारी अमिताभ गुप्तांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरूंना पाठविण्याऱ्या समितीचे प्रमुख

मुंबई: विशेष प्रतिनिधी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात येस बँकेतील घोटाळ्याप्रकरणातील आरोपी एचडीआयएलचे प्रमुख वाधवान यांना खास पत्र देत महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्याचे पत्र देत संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले आयपीएस अधिकारीअमिताभ गुप्ता यांनाच आता राज्य सरकारने पुन्हा एका समितीचे प्रमुख पद दिले. विशेष म्हणजे राज्यातील स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरून त्यांच्या मूळ गावी …

Read More »